बंदिगी कालरा आणि पुनीष शर्मा यांचा 'लव मी' अल्बम प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 12:01 PM2018-08-28T12:01:05+5:302018-08-28T12:08:03+5:30

बंदिगी कालरा आणि पुनीष शर्मा या दोघांची गाण्यातील केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते आहे. 

Bandigi Kalra and Punish Sharma's 'Love Me' albums are displayed | बंदिगी कालरा आणि पुनीष शर्मा यांचा 'लव मी' अल्बम प्रदर्शित

बंदिगी कालरा आणि पुनीष शर्मा यांचा 'लव मी' अल्बम प्रदर्शित

googlenewsNext
ठळक मुद्दे'लव मी'ला मीत बंधू आणि खुशबू गरेवालने दिला स्वरसाज 'लव मी' गाण्यातील केमिस्ट्री भावतेय चाहत्यांना

'बिग बॉस'च्या ११व्या सीझनचे स्पर्धक पुनीष शर्मा व बंदगी कालरा या शोदरम्यान त्यांच्या अफेयरमुळे चर्चेत होते. आता बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर दोघे रिलेशनशीपमुळे सतत चर्चेत राहिले आहेत आणि आता ते आणखीन एका कारणासाठी चर्चेत आले आहेत. ते एका व्हिडिओ साँगमुळे चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांचा 'लव मी' हे व्हिडिओ साँग प्रदर्शित झाला आहे. या गाण्यावर दोघे थिरकताना दिसत आहेत. या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते आहे. 


पुनीशने या व्हिडिओ अल्बमबद्दल सांगितले की, 'मीत ब्रदर्स माझ्या खूप जवळचे आहेत. ते माझ्या कुटुंबातील एक भाग आहे. ते दोघे खूप छान गायक आहेत आणि मी त्यांचा फॅन आहे. मला त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. जेव्हा तुम्ही खऱ्या पार्टनरसोबत परफॉर्म करता तेव्हा परफॉर्मन्स खूप छान होते. सुरूवातीला मी खूप नर्व्हस होतो. पण, नंतर मी खूप एन्जॉय केले. मला वाटते की आमचा दोघांचा हा अल्बम प्रेक्षकांना नक्की आवडेल.'

'लव मी' या गाण्याला मीत बंधू आणि खुशबू गरेवाल यांनी स्वरसाज दिला आहे. या अल्बममध्ये पहिल्याच भेटीत बंदिगी व पुनीष हे  दोघे कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात असे दाखवण्यात आले असून या अल्बममध्ये बंदिगी व पुनीष यांची भन्नाट केमिस्ट्री जुळली आहे. लव्ह मी या अल्बमचे संगीतकार मीत बंधू असून दिग्दर्शक विष्णुदेवा हे आहेत. तर कॅमेरामन आर. डी हे असून निर्माते मीत एन्टरटेन्मेंट आणि मिखिल चंदिरामानी तर सहनिर्माते डॉ. त्वचा हे आहेत. 

 

Web Title: Bandigi Kalra and Punish Sharma's 'Love Me' albums are displayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.