Video: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’! नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:49 AM2018-08-21T11:49:46+5:302018-08-21T11:50:25+5:30

‘निल बटे सन्नाटा’ आणि ‘बरेली की बर्फी’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारी दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी हिने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय. 

ashwiny iyer tiwari announces her next film panga starring kangana ranaut | Video: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’! नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ!!

Video: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’! नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ!!

googlenewsNext

‘निल बटे सन्नाटा’ आणि ‘बरेली की बर्फी’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारी दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी हिने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय. होय, या चित्रपटाचे नाव आहे,‘पंगा’. चित्रपटाचे शीर्षक जितके मजेदार, तितकीच अश्विनीने केलेली त्याची घोषणाही रंजक आहे.

 होय, चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा करणारा एक व्हिडिओ अश्विनीने शेअर केला आहे. या व्हिडिओतील काही कोट्स आणि चित्रपटाच्या टीमच्या कुटुंबाचे फोटो आहेत. पहिले कोट अश्विनीचे आहे़ ‘मी नवनवी आव्हानं स्वीकारून ती पूर्ण करू शकते, कारण कुटुंब माझ्या पाठीशी आहे,’ असे अश्विनीने लिहिले आहे. अश्विनी ही ‘दंगल’ फेम दिग्दर्शक नितेश तिवारीची पत्नी आहे.
अश्विनीच्या कोटनंतर कंगना राणौत हिचे कोट आहे. ‘हा प्रवास सोपा नव्हता. पण माझ्या कुटुंबाने या प्रवासात मला सोबत केली आणि हा प्रवास सोपा झाला,’ असे कंगना म्हणतेय.
यानंतर जस्सी गिल आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांचेही कोट आहे. या सर्व कोटनंतर चित्रपटाचे शीर्षक दाखवले गेले आहे. यापूर्वी कुणीही इतक्या इंटरेस्टिंग पद्धतीने चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केलेली नाही.
चित्रपटाची स्टारकास्ट आणि दिग्दर्शक बघता, हा चित्रपट एक ‘कंटेट बेस्ट’ चित्रपट असणार, असे वाटतेय. कंगना राणौत यात मुख्य भूमिकेत आहे. म्हणजे, कंगना पुन्हा एकदा पंगा घेणार आहे. आता कुणाशी ते लवकरचं कळेल. हा चित्रपट पुढीलवर्षी रिलीज होणार आहे.

लवकरच कंगनाचा ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांशी’हा पीरियड ड्रामा रिलीज होतोय. यानंतर ती ‘मेंटल है क्या’ या चित्रपटातही कंगना दिसणार आहे. 

Web Title: ashwiny iyer tiwari announces her next film panga starring kangana ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.