रणवीर सिंगला आली अर्जुन कपूरची आठवण! वाचा मजेशीर ट्विट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 03:50 PM2018-12-23T15:50:18+5:302018-12-23T15:51:41+5:30

रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरची मैत्री इंडस्ट्रीत चांगलीच प्रसिद्ध आहे. दोघांच्या ब्रोमान्सच्या चर्चा सगळीकडे असतात. ‘गुंडे’ या चित्रपटात रणवीर व अर्जुन एकत्र दिसले आणि तेव्हापासून एकमेकांचे घट्ट मित्र झालेत. पण तेव्हापासून ही जोडी कुठेही दिसली नाही.

arjun kapoor replies ranveer singh in a unique way says baba ne baba se dosti ki hai ayaashi nahi | रणवीर सिंगला आली अर्जुन कपूरची आठवण! वाचा मजेशीर ट्विट!!

रणवीर सिंगला आली अर्जुन कपूरची आठवण! वाचा मजेशीर ट्विट!!

googlenewsNext
ठळक मुद्देतूर्तास रणवीर सिंग आपल्या ‘सिम्बा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.हा चित्रपट येत्या शुक्रवारी चित्रपटगृहांत झळकणार आहे.

रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरची मैत्री इंडस्ट्रीत चांगलीच प्रसिद्ध आहे. दोघांच्या ब्रोमान्सच्या चर्चा सगळीकडे असतात. ‘गुंडे’ या चित्रपटात रणवीर व अर्जुन एकत्र दिसले आणि तेव्हापासून एकमेकांचे घट्ट मित्र झालेत. पण तेव्हापासून ही जोडी कुठेही दिसली नाही. ना चित्रपटात, ना कुठल्या इव्हेंटमध्ये. आता अशात चाहत्यांना या जोडीची आठवण येणे  साहजिकच आहे. या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यास उत्सूक असलेल्या एका चाहत्याने मग थेट रणवीरलाचं याबद्दल विचारून टाकले. तुम्हा दोघांची जोडी पुन्हा कधी एकत्र येतेय,असा प्रश्न एका चाहत्याने केला. या चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना, ‘होय, मलाही त्याची खूप आठवण येते. बाबाला माझ्यासाठी वेळ नाही. तो ‘पानीपत’मध्ये बिझी आहे,’ असे रणवीरने लिहिले.



आता आपला मित्र इतकी अनावर आठवण काढतोय म्हटल्यावर बाबा अर्जुन कसा बोलणार नाही. रणवीरच्या या उत्तरावर मग अर्जुननेही उत्तर दिले. ‘आपण एकत्र येऊच. बाबाने बाबा से दोस्ती की है, अय्याशी नहीं,’ असे अर्जुनने लिहिले. तुम्हाला आठवत असेलच की, हा डायलॉग रणवीर सिंगच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सुपरडुपर हिट चित्रपटातील आहे.



तूर्तास रणवीर सिंग आपल्या ‘सिम्बा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.हा चित्रपट येत्या शुक्रवारी चित्रपटगृहांत झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर व सारा अली खानचा रोमॅन्टिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘सिम्बा’ हा चित्रपट साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. ‘सिम्बा’ त रणवीर पहिल्यांदा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तर अर्जुन हा ‘पानीपत’ या चित्रपटात व्यस्त आहे.

Web Title: arjun kapoor replies ranveer singh in a unique way says baba ne baba se dosti ki hai ayaashi nahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.