अर्जुन कपूर व परिणीती चोप्राचा 'नमस्ते इंग्लंड'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 05:13 PM2018-08-14T17:13:41+5:302018-08-14T17:14:26+5:30

विपुल अमृतलाल शाह दिग्दर्शित 'नमस्ते इंग्लंड' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Arjun Kapoor and Parineeti Chopra's 'Namaste England' | अर्जुन कपूर व परिणीती चोप्राचा 'नमस्ते इंग्लंड'

अर्जुन कपूर व परिणीती चोप्राचा 'नमस्ते इंग्लंड'

ठळक मुद्दे'नमस्ते इंग्लंड' हा आहे चित्रपट रोमँटिक कॉमेडी

अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनी 'इश्कजादे' चित्रपटातून बॉलिवूडमधील करियरला सुरूवात केली होती. या चित्रपटातील त्यांची प्रेमकथा प्रेक्षकांना भावली होती आणि या जोडीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. या चित्रपटानंतर बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. अर्जुन व परिणीती विपुल अमृतलाल शाह दिग्दर्शित 'नमस्ते लंडन' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. 

विपुल अमृतलाल शाह दिग्दर्शित 'नमस्ते इंग्लंड' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर अर्जुन आणि परिणीती दोघांनीही हे पोस्टर ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहे.

'नमस्ते इंग्लंड' हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी असून या चित्रपटाची कथा दोन प्रेमीयुगुलांभोवती फिरते.  ‘नमस्ते इंग्लंड’ची धूरा सांभाळणाऱ्या विपुल शाह यांनी यापूर्वी 'नमस्ते लंडन' या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. दिग्दर्शक विपुल शाहने पंजाबमधील वेगवेगळ्या लोकेशनवर शूट करण्यात आले आहे. जो आजपर्यंत बॉलिवूडमध्ये दाखवण्यात आलेले नाहीत. ढाका, पॅरिस, लंडनसारख्या शहरांमध्ये चित्रपटाची शूटिंग झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

११ वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून अक्षय कुमार आणि कतरिना कैफ ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. विशेष म्हणजे या जोडीने प्रेक्षकांची मनेही जिंकली होती. त्यामुळे अर्जुन- परिणीतीची जोडी प्रेक्षकांचे मन जिंकण्यास यशस्वी ठरतात का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Arjun Kapoor and Parineeti Chopra's 'Namaste England'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.