अनुराग कश्यपला आवडले नव्हते ‘युवा’मधील अभिषेक बच्चनचे काम! अनेक वर्षे होता अबोला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 06:51 PM2018-09-04T18:51:49+5:302018-09-04T18:52:14+5:30

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘मनमर्जियां’च्या स्टारकास्टमध्ये अभिषेक बच्चने नाव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता

anurag kashyap revealed the reason behind fight with abhishek bachchan | अनुराग कश्यपला आवडले नव्हते ‘युवा’मधील अभिषेक बच्चनचे काम! अनेक वर्षे होता अबोला!!

अनुराग कश्यपला आवडले नव्हते ‘युवा’मधील अभिषेक बच्चनचे काम! अनेक वर्षे होता अबोला!!

googlenewsNext

अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल सध्या आपल्या ‘मनमर्जियां’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. सध्या या चित्रपटाचे धडाकेबाज प्रमोशन सुरू आहे, साहजिकचं या प्रमोशनल इव्हेंटमधून एकापेक्षा एक रोचक माहिती समोर येत आहे. खरे तर ‘मनमर्जियां’च्या स्टारकास्टमध्ये अभिषेक बच्चने नाव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. याचे कारण म्हणजे, अनुराग व अभिषेक यांचे संबंध फार काही चांगले नव्हते. दोघेही १० ते १२ वर्षे एकमेकांशी बोलले नव्हते. ‘युवा’ या चित्रपटाच्या रिलीजनंतर अभिषेक व अनुराग यांचे संबंध बिघडले होते. २००४ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा अनुरागने यातील अभिषेकच्या कामावर जाहिर नापसंती व्यक्त केली होती. अनुराग या चित्रपटाचा पटकथालेखक होता आणि त्याने आपल्या ब्लॉगमध्ये अभिषेकवर टीका केली होती. अभिषेकने आपल्या भूमिकेला न्याय दिला नाही. ही भूमिका आणखी रोचक होऊ शकली असती, असे अनुरागचे मत होते. याऊलट अनुराग वगळला तर प्रत्येकजण मणिरत्नम दिग्दर्शित ‘युवा’मधील अभिषेकच्या कामाचे कौतुक करत होते. अभिषेकने या चित्रपटात लल्लनची भूमिका साकारली होती. चित्रपटाचा पटकथालेखक आपल्या कामावर टीका करतो, साहजिकचं ही गोष्ट अभिषेकला खटकली होती. या घटनेनंतर अभिषेक व अनुराग दोघांनीही एकमेकांशी अबोला धरला. दोघेही एकमेकांना इग्नोर करतानाच दिसले. असे असताना अचानक अनुरागच्या चित्रपटात अभिषेकची वर्णी लागलेली पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. एकत्र काम केल्यानंतर आता अनुराग व अभिषेक दोघेही चांगले मित्र आहेत. एकमेकांचे तोंडही पाहणे पसंत न करणारे हे दिग्गज आता परस्परांची प्रशंसा करताना थकत नाहीयेत.

Web Title: anurag kashyap revealed the reason behind fight with abhishek bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.