अन् रणवीर सिंगने जिम बाहेर सुरू केले फोटोशूट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 11:45 AM2018-07-13T11:45:09+5:302018-07-13T11:46:00+5:30

रणवीर सिंग लवकरच ‘सिम्बा’ या चित्रपटात एका भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे़ या चित्रपटासाठी रणवीरने बरेच शरीर कमावलेय.

 And Ranveer Singh started out of the gym Photoshoot! | अन् रणवीर सिंगने जिम बाहेर सुरू केले फोटोशूट!

अन् रणवीर सिंगने जिम बाहेर सुरू केले फोटोशूट!

googlenewsNext

रणवीर सिंग लवकरच ‘सिम्बा’ या चित्रपटात एका भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे़ या चित्रपटासाठी रणवीरने बरेच शरीर कमावलेय. या चित्रपटाच्यानिमित्ताने रणवीर प्रथमच दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत काम करतोय. चित्रपटाच्या शूटींगचे फर्स्ट शेड्यूल अलीकडेच संपले. यानंतर सलमान मुंबईत परतला. गुरुवारी संध्याकाळी रणवीर वांद्रयातील एका जिमबाहेर दिसला आणि केवळ दिसलाच नाही तर मीडियासोबत त्याने बरीच मौजमस्ती केली. मीडियाच्या फोटोग्राफर्सला तो अनेक बॉडी पोज देताना दिसला. जिमच्या बाहेरचं त्याने फोटोशूट केले.



रणवीर आपल्या शरिराला वेगाने ट्रान्सफॉर्म करतो. काही महिन्यांपूर्वी ‘गली ब्वॉय’साठी त्याने स्वत:चे वजन बरेच कमी केले होते. अन् त्यापूर्वी ‘पद्मावत’साठी त्याने अतिशय पीळदार शरीर कमावले होते.

‘गली ब्वॉय’ पूर्ण होताच रणवीर पुन्हा मस्कुलर अवतारात दिसतोय. ‘सिम्बा’साठी त्याने शरीर कमावलेय.

‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंगसोबत सैफ अली खानही प्रमुख भूमिकेत आहे. येत्या २८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

Web Title:  And Ranveer Singh started out of the gym Photoshoot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.