अमृता सिंगने बॉयफ्रेंड सनी देओलच्या विदेशातील पत्नीचा शोध घेऊन फोडले होते बिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 10:46 AM2017-08-17T10:46:44+5:302017-08-17T16:46:36+5:30

‘बेताब’च्या सेटवर जेव्हा सनी आणि अमृता यांच्यात जवळीकता निर्माण झाली तेव्हा दोघांचे किस्से इंडस्ट्रीमध्ये चांगलेच चर्चिले जात असत. अमृताने तर उघडपणे सनीबरोबरच्या नात्याचा खुलासा केला होता.

Amrita Singh blasted boyfriend Sunny Deol's wife in search of a foreign wife! | अमृता सिंगने बॉयफ्रेंड सनी देओलच्या विदेशातील पत्नीचा शोध घेऊन फोडले होते बिंग!

अमृता सिंगने बॉयफ्रेंड सनी देओलच्या विदेशातील पत्नीचा शोध घेऊन फोडले होते बिंग!

googlenewsNext
८३ मध्ये ‘बेताब’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री अमृता सिंग पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आली होती. या चित्रपटानंतर तिला अनेक चित्रपटांच्या आॅफर्स मिळू लागल्या. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या रांगेत तिला स्थान मिळाले. अमृताने तिच्या करिअरमध्ये जवळपास ५० चित्रपट केले, त्यातील बहुतांश चित्रपट सुपरहिट ठरले. अमृताला तिच्या करिअरमध्ये जवळपास सर्व दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. अमिताभ बच्चन, अनिल कपूर, संजय दत्त, सनी देओल यांसारख्या दिग्गजांबरोबर तिने काम केले. तिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. अमृताचे लव्ह अफेअर्सही त्याकाळी खूप गाजले. अनेक अभिनेत्यांबरोबर तिचे नावही जोडले गेले. सनी देओलबरोबरची तिची लव्हस्टोरी त्याकाळी खूपच गाजली, परंतु ही लव्हस्टोरी खूपच विचित्र पद्धतीने संपुष्टात आली. 

‘बेताब’च्या सेटवर जेव्हा सनी आणि अमृता यांच्यात जवळीकता निर्माण झाली तेव्हा दोघांचे किस्से इंडस्ट्रीमध्ये चांगलेच चर्चिले जात असत. अमृताने तर उघडपणे सनीबरोबरच्या नात्याचा खुलासा केला होता. अमृता म्हणायची की, तिच्या आयुष्यात जर कोणी रिअल मॅन असेल तर तो सनी देओल आहे. मात्र सनीबद्दल कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्याअगोदर अमृताने त्याच्याविषयी जाणून घेणे अधिक संयुक्तिक समजले. ती सनीच्या आवडी-निवडी समजून घेत होती. परंतु त्याच्या सवयी जाणून घेताना अमृताला त्याच्याबद्दलचे असे एक सत्य समजले, ज्यामुळे अमृताने त्याच्यापासून दूर जाणे पसंत केले. 



अमृताला सनीच्या आवडी-निवडी जाणून घेताना तो अगोदरच विवाहित असल्याचे सत्य तिला समजले. तसेच सनीची पत्नी भारतात नव्हे तर विदेशात राहत असल्याचे उघड झाले. वास्तविक सनीने पूजा देओल हिच्याशी अगोदर लग्न केले होते. जेव्हा सनी नेहमीच लंडनला जात होता, तेव्हा अमृताने त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याच्या लंडनवारीचा अमृताने शोध लावला तेव्हा त्याची पत्नी तिथे राहत असल्याची बाब समोर आली. जेव्हा अमृताला ही बाब कळाली तेव्हा तिने त्याच क्षणी सनीबरोबरचे सर्व नाते तोडले. 

पुढे अमृताने १९९१ मध्ये आपल्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानशी विवाह केला. लग्नानंतर तिने धर्मही बदलला. पुढे अमृताने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. अमृताला इब्राहिम आणि सारा नावाची दोन मुले आहेत. अमृताचा सैफबरोबरचा संसार १३ वर्षांनी संपुष्टात आला. २००४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 

Web Title: Amrita Singh blasted boyfriend Sunny Deol's wife in search of a foreign wife!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.