आलिया भटची ‘गलती से मिस्टेक’! सर्वांसमोर वरूण धवनला म्हटले रणबीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 10:30 AM2019-04-16T10:30:21+5:302019-04-16T10:31:34+5:30

आलिया भट रणबीर कपूरच्या प्रेमात किती वेडी झालीय, याचा पुरावा अलीकडे मिळाला. आलिया रणबीरला एक क्षणही विसरू शकत नाहीये. एका शोमध्ये आलिया रणबीरच्या आठवणीत अशी काही रमली की, ती ‘गलती से मिस्टेक’ करून बसली.

alia bhatt accidentally calling varun dhawan as ranbir kapoor | आलिया भटची ‘गलती से मिस्टेक’! सर्वांसमोर वरूण धवनला म्हटले रणबीर!

आलिया भटची ‘गलती से मिस्टेक’! सर्वांसमोर वरूण धवनला म्हटले रणबीर!

googlenewsNext
ठळक मुद्देतूर्तास रणबीर कपूर व आलिया भट दोघेही लग्न करणार, अशी चर्चा आहे. ऋषी कपूर भारतात परतल्यानंतर लगेच रणबीर व आलियाचा साखरपुडा होणार, असेही मानले जात आहे.

आलिया भटरणबीर कपूरच्या प्रेमात किती वेडी झालीय, याचा पुरावा अलीकडे मिळाला. आलिया रणबीरला एक क्षणही विसरू शकत नाहीये. एका शोमध्ये आलिया रणबीरच्या आठवणीत अशी काही रमली की, ती ‘गलती से मिस्टेक’ करून बसली. होय, सध्या आलिया ‘कलंक’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटसाठी ‘कलंक’ची संपूर्ण स्टारकास्ट एका शोमध्ये पोहोचली. आलिया व वरूण एकमेकांच्या शेजारी बसले असताना अचानक वरूण आलियाच्या केसांशी खेळून तिच्या खोड्या काढू लागला. आलियाने वरूणला थांबवले. पण वरूण थांबला नाही. काही वेळानंतर वरूण पुन्हा आलियाच्या खोड्या काढू लागला आणि यावेळी वरूणला थांबवताना आलियाच्या तोंडून वरूणऐवजी चक्क रणबीर निघाले. आलियाच्या तोंडून रणबीर ऐकून वरूणसह सगळेच हसू लागलेत. आदित्य राय कपूर, सोनाक्षी सिन्हा यांनाही हसू आवरणे कठीण झाले. इकडे आलियाच्या चेहरा शरमेने लाल झाला.




आलियाच्या हातून झालेल्या या ‘गलती से मिस्टेक’चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आलिया रणबीरच्या प्रेमात किती आकंठ बुडालीय, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
तूर्तास रणबीर कपूरआलिया भट दोघेही लग्न करणार, अशी चर्चा आहे. ऋषी कपूर भारतात परतल्यानंतर लगेच रणबीर व आलियाचा साखरपुडा होणार, असेही मानले जात आहे. सध्या हे लव्हबर्ड ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिझी आहे. ‘कलंक’बद्दल सांगायचे तर उद्या बुधवारी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. यानंतर आलिया संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात बिझी होणार आहे. या चित्रपटात ती सलमान खानसोबत झळकणार आहे.

Web Title: alia bhatt accidentally calling varun dhawan as ranbir kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.