ही मुलगी होणार सुनील शेट्टीची सून! अहान शेट्टीने दिली कबुली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 10:46 AM2019-02-15T10:46:26+5:302019-02-15T10:46:38+5:30

व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी बॉलिवूड इंडस्ट्रीच्या मोठ्-मोठ्या रहस्यांवरून पडदा उठतो. काल अशाच एका रहस्यावरून पडदा उठला. होय, कोण बनणार शेट्टी घराण्याची सून? हे संपूर्ण जगाला कळले.

ahan shetty finally accepted that he is dating tania shroff | ही मुलगी होणार सुनील शेट्टीची सून! अहान शेट्टीने दिली कबुली!!

ही मुलगी होणार सुनील शेट्टीची सून! अहान शेट्टीने दिली कबुली!!

googlenewsNext
ठळक मुद्देअहान शेट्टीबद्दल सांगायचे तर तो लवकरच साजिद नाडियाडवालाच्या ‘आरएक्स 100’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. निर्माता साजिद नाडियादवाला अहानला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे.

व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी बॉलिवूड इंडस्ट्रीच्या मोठ्-मोठ्या रहस्यांवरून पडदा उठतो. काल अशाच एका रहस्यावरून पडदा उठला. होय, कोण बनणार शेट्टी घराण्याची सून? हे संपूर्ण जगाला कळले. आम्ही बोलतोय ते सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीबद्दल. होय, अहानच्या आयुष्यात असलेल्या लव्ह लेडीबद्दल खुलासा झालाय. काल व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी अहानने आपल्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोत अहान एका मुलीसोबत दिसतोय. या फोटोला अहानने कुठलेही कॅप्शन दिलेले नाही. पण ‘हार्ट’चा एक साईन दिलाय. यावरून स्पष्ट आहे की, फोटोतील या मुलीने अहानच्या हृदयात स्थान मिळवलेय. आता ही मुलगी कोण, ही उत्सुकता तुम्हाला असेल. तर तिचे नाव आहे तनिया श्रॉफ. 


तनिया व अहान अनेकदा एकमेकांसोबत दिसले. यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. पण दोघांनीही या नात्याबद्दल बोलणे टाळले. पण आता अहानने स्वत:चं या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे.


अहान शेट्टीबद्दल सांगायचे तर तो लवकरच साजिद नाडियाडवालाच्या ‘आरएक्स 100’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. निर्माता साजिद नाडियादवाला अहानला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. ‘आरएक्स 100’ हा एका तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रिमेक आहे. यात अहान मुख्य भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शन मिलन लुथरिया हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.  मिलन लुथरियाने आत्तापर्यंत  वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई , द डर्टी पिक्चर, बादशाहो  यांसारख्या चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
 अहानच्या आधी त्याची बहीण अथिया शेट्टी हिने २०१५ मध्ये बॉलिवूड डेब्यू केला होता. सलमान खान निर्मित ‘हिरो’मधून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. या चित्रपटात अथिया सूरज पांचोलीसोबत दिसली होती. पण हा चित्रपट दणकून आपटला होता. अथिया व सूरजची जोडी प्रेक्षकांना आवडली नव्हती. अथियानंतर अहान आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. आता त्याचा डेब्यू किती यशस्वी होतो, ते बघूच.

Web Title: ahan shetty finally accepted that he is dating tania shroff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.