पूजा बत्रामुळे अभिनेता अक्षय कुमाराला मिळायची बॉलिवूडच्या पार्टीमध्ये एंट्री ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 08:46 AM2017-10-27T08:46:03+5:302017-10-27T14:16:03+5:30

विरासत चित्रपटातून पूजा बत्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पूजाचा आज 41 वा वाढदिवस आहे. पूजाचा जन्म उत्तरप्रदेशमधील फैजाबादमध्ये झाला होता. ...

Actor Akshay Kumar starred in Bollywood actor Pooja Batra? | पूजा बत्रामुळे अभिनेता अक्षय कुमाराला मिळायची बॉलिवूडच्या पार्टीमध्ये एंट्री ?

पूजा बत्रामुळे अभिनेता अक्षय कुमाराला मिळायची बॉलिवूडच्या पार्टीमध्ये एंट्री ?

googlenewsNext
रासत चित्रपटातून पूजा बत्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पूजाचा आज 41 वा वाढदिवस आहे. पूजाचा जन्म उत्तरप्रदेशमधील फैजाबादमध्ये झाला होता. 1993 साली तिने मिसा इंडियाचा किताब जिंकला होता. अक्षय कुमारसोबत असलेल्या तिच्या नात्याची खूप चर्चा झाली. अक्षय कुमारशी तिची ओळख चित्रपटात यायच्या आधी झाली होती. पूजाची अक्षयशी ओळख मॉडलिंगच्या दिवसात झाली होती. असे ही म्हटले जाते कि बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये अक्षय कुमारला एंट्री पूजा बत्रामुळे मिळायची.  मात्र अक्षय आणि पूजाचे अफेअर जास्त काळ टिकले नाही. अक्षयपासून वेगळे झाल्यानंतर 2002मध्ये पूजाने ऑरथोपिडिशियन सर्जन डॉक्टर सोनू आहलूवालियासोबत लग्न केले. मात्र पूजाचे हे लग्न फारकाळ टिकले नाही. 2011मध्ये पूजाने सोनूपासून घटस्फोट घेतला. सध्या पूजा एक युरोपियनला डेट करते आहे. त्याच्यासोबतचे फोटो पूजा नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर पूजा योगा करताना दरम्यानचे फोटो शेअर करत असते.



ऐवढच नाही तर अक्षय कुमारप्रमाणे पूजा बत्रा हि मार्शल आर्टमध्ये पारंगत आहे. गेल्या वर्षी आलेल्या एबीसीडी 2मध्ये पूजा दिसली होती. तसेच पंजाबी चित्रपट किलर पंजाबीमध्ये ही तिने काम केले होते. चंद्रलेखा, हसीना मान जायेगी, कही प्यार न हो जाए, ताज महलसारख्या चित्रपटात तिने काम केले. त्याच बरोबर तिने हॉलिवूडमध्ये ही काम केले आहे. बॉलिवूड आणि हॉलिवुडमध्ये तांत्रिक बाबी सोडल्या तर फारसा काही फरक पूजाला जाणवत नाही. फक्त हॉलिवूडमध्ये बॉलिवूडपेक्षा जास्त प्रोफेशनलिसम असल्याचे पूजाने एका इंटरव्ह्यू दरम्यान सांगितले होते. तसेच पूजाला भविष्यात काळात  क्रीडा विषयावर बनणाऱ्या चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. तिचा हा ड्रीम रोल असल्याचे तिने सांगितले होते. तसेच पूजाला मार्शल आर्टवर आधरित चित्रपटातही काम करण्याचे आहे.   

Web Title: Actor Akshay Kumar starred in Bollywood actor Pooja Batra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.