आयुषमान खुराना व भूमी पेडणेकरची केमिस्ट्री पुन्हा एकदा ह्या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 03:46 PM2018-12-08T15:46:11+5:302018-12-08T15:51:20+5:30

'स्त्री' चित्रपटाचा दिग्दर्शक अमर कौशिक यांचा आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट बालासाठी आयुषमान खुराना व भूमी पेडणेकर यांची निवड करण्यात आली असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढील वर्षी मार्चमध्ये सुरूवात होणार आहे.

Aayushman Khurana And Bhumi Pednekar Working again in this film | आयुषमान खुराना व भूमी पेडणेकरची केमिस्ट्री पुन्हा एकदा ह्या सिनेमात

आयुषमान खुराना व भूमी पेडणेकरची केमिस्ट्री पुन्हा एकदा ह्या सिनेमात

googlenewsNext
ठळक मुद्देरोमँटिक कॉमेडी चित्रपट 'बाला' 'बाला'मध्ये दिसणार आयुषमान व भूमी

आयुषमान खुराना व भूमी पेडणेकर यांनी 'दम लगा के हईशा' व 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटात एकत्र काम केले. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्यानंतर आता हे दोघे आणखीन एका सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत. 

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, ''स्त्री' चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे अमर कौशिक रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'बाला' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या चित्रपटासाठी आयुषमान खुराना व भूमी पेडणेकरची निवड करण्यात आली आहे. अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट 'स्त्री'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता त्यांचा आगामी चित्रपट 'बाला'चे चित्रीकरण पुढील वर्षी मार्चमध्ये सुरू होणार आहे आणि हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.'
चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून ते म्हणाले की, ''बाला' ही अशा व्यक्तीची कथा आहे. ज्याचे केस तरूणाईतच गळू लागतात आणि एक मुलगी जिचा रंग सावळा असल्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.' 
ते पुढे म्हणाले की, 'या चित्रपटातून बऱ्याचदा आपण बाहेरील सौंदर्यामुळे आकर्षित होतो. वास्तविक व्यक्ती जाणून घेत नाही. त्यामुळे कित्येक नाती तुटतात, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटासाठी पहिली व शेवटची पसंती आयुषमानलाच होती कारण अशा जॉ़नरचे चित्रपट खूप सहजरित्या साकारतो. '

Web Title: Aayushman Khurana And Bhumi Pednekar Working again in this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.