बोल्ड सोफिया हयात झाली नन, मदर सोफिया

By Admin | Published: May 24, 2016 01:41 PM2016-05-24T13:41:08+5:302016-05-24T13:48:46+5:30

बोल्ड रोल आणि बिग बॉसमधल्या वादविवादामध्ये कायम चर्चेत राहिलेल्या सोफिय हयातनं भौतिक विश्व असार आहे असं मानत, आत्मिक उन्नतीचा मार्ग स्वीकारत असल्याचे इन्स्टाग्रामवर जाहीर केले

Bold Sophia survived nun, Mother Sophia | बोल्ड सोफिया हयात झाली नन, मदर सोफिया

बोल्ड सोफिया हयात झाली नन, मदर सोफिया

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - बोल्ड रोल आणि बिग बॉसमधल्या वादविवादामध्ये कायम चर्चेत राहिलेल्या सोफिय हयातनं भौतिक विश्व असार आहे असं मानत, आत्मिक उन्नतीचा मार्ग स्वीकारत असल्याचे इन्स्टाग्रामवर जाहीर केले आहे. सोफिया नन झाली असून आता मी मदर सोफिया, सगळ्यांची आई असल्याचे तिनं जाहीर केले आहे.
 
तीन वर्षांपूर्वी बिग बॉसमध्ये सह कलाकारांशी भांडणं उकरून काढणारी अशी सोफियाची ओळख होती. एकदा तर तिनं अरमान कोहलीविरोधात पोलिसांकडे तक्रारही केली होती. दोन वर्षांपूर्वी रोहित शर्मानं श्रीलंकेविरोधात ऐतिहासिक 264 धावा केल्या तेव्हा सोफियानं न्यूड फोटो शूट करून ते रोहितला समर्पित केलं होतं. दोघं नंतर काही काळासाठी रिलेशनशिपमध्ये असल्याचीही चर्चा होती.
मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून सोफियानं तिच्यात झालेला अध्यात्मिक बदल सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केला आहे. स्वत:चा एक व्हिडीयो शेअर करताना त्याची कॅप्शन तिनं दिली होती...  "The divine mother is here.."
 
जुलै 2012 मध्ये व्होग इटालियानं सोफियाचं वर्णन कर्व्ही आयकॉन असं केलं होतं, तर सप्टेंबर 2013 मध्ये इंग्लंडच्या FHM या नियतकालिकानं जगातल्या सेक्सी विमेनमध्ये सोफियाला 81व्या स्थानावर ठेवलं होतं. आता या सेक्स आयकॉननं भौतिक सुखांचा त्याग करत पारमार्थिक विश्वाला जवळ केलं असून जगन्माता झाल्याचं घोषित केलं आहे.

Web Title: Bold Sophia survived nun, Mother Sophia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.