'पिंक'ची धमाल, १० दिवसात ६४.९० कोटी रुपयांची कमाई

By Admin | Published: September 26, 2016 09:04 PM2016-09-26T21:04:29+5:302016-09-26T21:04:29+5:30

पिंक या चित्रपटाचे सगळेच कौतुक करत आहेत. त्यामुळे संथ सुरुवातीनंतर पिंकच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे.

Biggest of 'Pink', earning Rs. 64.90 crores in 10 days | 'पिंक'ची धमाल, १० दिवसात ६४.९० कोटी रुपयांची कमाई

'पिंक'ची धमाल, १० दिवसात ६४.९० कोटी रुपयांची कमाई

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - पिंक या चित्रपटाचे सगळेच कौतुक करत आहेत. त्यामुळे संथ सुरुवातीनंतर पिंकच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. अमिताभ बच्चन स्टारर नुकत्याच रिलीज झालेल्या पिंक चित्रपटाने क्रिटिक्स बरोबरच प्रेक्षकांचीही वाहवा मिळवली आहे. पहिल्या आठवडयात ३५.९१ कोटींचे कलेक्शन केले आहे. तर दुसऱ्या आठवड्यातही पिंक चित्रपटाने तिकिटबारीवर आपला जलवा कायम ठेवला आहे. दुसऱ्या आठवड्यात तिकिटबारीवर १५.३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर १० दिवसात वर्ल्डवाईज पिंक चित्रपटाने ६४.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

अमिताभ यांच्या पिंक चित्रपटाचा रितेश देशमुख-नर्गीस स्टारर बँजो चित्रपटाला फटका बसला बसला आहे. बँजो पहिल्या ३ दिवसात ५.९२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

वुमन एम्पॉवरमेंटवर आधारित पिंक या चित्रपटात बिग बी शिवाय तापसी पन्नू, किर्ति कुल्हारी अँड्रिया तेरियांग, अंगद बेदी, पियूष मित्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनिरुद्ध रॉय चौधरीच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या या चित्रपटातील दमदार डायलॉग्ज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

‘राज-रिबोट’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर साधारण व्यवसाय केला आहे. ‘बार बार देखो’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर कमाल करेल असे सगळ्यांना वाटत असताना या चित्रपटाने पूर्णच अपेक्षाभंग केला.

Web Title: Biggest of 'Pink', earning Rs. 64.90 crores in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.