'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 10:27 AM2024-05-21T10:27:42+5:302024-05-21T10:28:13+5:30

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची घोषणा! 'हा' अभिनेता करणार होस्ट

bigg boss marathi 5 ritesh deshmukh will host new season instead of mahesh manjarekar promo out | 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट

टीव्हीवरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने आणि चवीने पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. झगमगत्या दुनियेतील चमचमते सितारे या शोमध्ये पाहायला मिळतात. टीव्हीवरील ग्लॅमरस चेहऱ्यांवरचा मुखवटा उतरून या शोमध्ये कलाकारांचे खरे चेहरे पाहायला मिळतात. नुकतंच 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. 'बिग बॉस मराठी ५' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, यामध्ये महेश मांजरेकर दिसणार नाहीत. 

'बिग बॉस मराठी'च्या ४ सीझनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. हे चारही सीझन महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते. पण, 'बिग बॉस मराठी ५' मध्ये मात्र महेश मांजरेकर दिसणार नाहीत. 'बिग बॉस मराठी'च्या या नव्या सीझनमध्ये नवा होस्ट दिसणार आहे. कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया पेजवरुन नव्या सीझनची घोषणा करण्यात आली असून नव्या होस्टच्या चेहऱ्यावरुनही पडदा हटवण्यात आला आहे. 

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार आहे. "मराठी मनोरंजनाचा “BIGG BOSS"...सर्वांना 'वेड' लावायला येतोय...'लयभारी'होस्ट, सुपरस्टार रितेश देशमुख!!", असं म्हणत 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 'बिग बॉस'च्या या नव्या सीझनबरोबरच नव्या होस्टला पाहण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत. 

'बिग बॉस मराठी ४' नंतर नव्या सीझनची प्रेक्षक वाट बघत होते. 'बिग बॉस' कधी सुरू होणार, अशी विचारणा चाहत्यांकडून होत होती. आता 'बिग बॉस मराठी ५' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये कोणकोणते कलाकार दिसणार याबाबत आता चाहत्यांना उत्सुकता आहे. 

Web Title: bigg boss marathi 5 ritesh deshmukh will host new season instead of mahesh manjarekar promo out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.