"बिग बी"कडून आप नेते कुमार विश्वास यांना नोटीस

By Admin | Published: July 12, 2017 08:23 PM2017-07-12T20:23:29+5:302017-07-12T20:54:26+5:30

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आम आदमी पार्टीचे नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी

From "Big B" you notice to Kumar Kumar Vishwas | "बिग बी"कडून आप नेते कुमार विश्वास यांना नोटीस

"बिग बी"कडून आप नेते कुमार विश्वास यांना नोटीस

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आम आदमी पार्टीचे नेते आणि कवी कुमार विश्वास यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. कुमार विश्वास यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांची कविता सादर केली होती. तसेच, या कार्यक्रमाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केली होता. यामुळे कुमार विश्वास यांच्यावर अमिताभ बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी अभिताभ बच्चन यांनी कुमार विश्वार यांच्यावर कॉपीराइटची कायदेशीर नोटीस पाठविली असून यामध्ये कार्यक्रमात सादर केलेली हरिवंश राय बच्चन यांची कवितेचा व्हिडिओ युट्युबवरुन डिलीट करावा आणि त्यातून मिळाले मानधन देण्यास सांगितले आहे. तसेच, हरिवंशराय बच्चन यांची कविता माझ्या परवानगी शिवाय सार्वजनिक कार्यक्रमात सादर केलीच कशी काय? असा प्रश्न विचारत अमिताभ बच्चन यांनी कुमार विश्वास यांच्यावर चोरीचा आरोप लावला. 
दरम्यान, कुमार विश्वास यांनी हरिवंश राय बच्चन यांची कविता सादर केल्याप्रकरणी अमिताभ बच्चन यांची ट्विटरच्या माध्यमातून माफी मागितली आहे. तसेच, त्यांनी युट्युबवर अपलोड केलेला व्हिडिओ सुद्धा डिलीट केला आहे. यावेळी कुमार विश्वास म्हणाले की, हरिवंश राय बच्चन यांच्या कवितेतून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार होतो. याशिवाय माझा दुसरा कोणताही हेतू नव्हता. तसेच, हा व्हिडिओ डिलीट करतो आणि यापासून मिळालेले 32 रुपये आपल्याला पाठवितो.  
कुमार विश्वास तर्पण नावाने आपल्या कार्यक्रमात सादर केलेल्या कवितांचा व्हिडिओ युट्युबवर अपलोड करतात. 8 जुलै रोजी कुमार विश्वास यांनी हरिवंश राय बच्चन यांची कविता सादर केलेला व्हिडिओ युट्युब आणि ट्विटरवर अपलोड केला होता.