भारत - पाकिस्तान सामन्यासाठी अमिताभदेखील कोलकात्यात

By Admin | Published: March 19, 2016 05:00 PM2016-03-19T17:00:47+5:302016-03-19T17:01:43+5:30

भारत - पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी अमिताभ बच्चन राष्ट्रगीत गाणार आहेत

Amitabh Bachchan also holds a tour of Kolkata for the India-Pakistan match | भारत - पाकिस्तान सामन्यासाठी अमिताभदेखील कोलकात्यात

भारत - पाकिस्तान सामन्यासाठी अमिताभदेखील कोलकात्यात

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
कोलकाता, दि. १९ - टी-20 वर्ल्डकपमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत - पाकिस्तान शनिवारी कोलकात्यात भिडणार आहेत. भारत - पाकिस्तान सामना असला की फक्त भारत आणि पाकिस्तानातीलच नाही तर जगातील क्रिकेटरसिकांचं या सामन्याकडे लक्ष लागलेलं असतं. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चनदेखील यामध्ये मागे नाहीत. भारत - पाकिस्तान सामन्याचा अनुभव घेण्यासाठी अमिताभ बच्चन कोलकात्यात पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत अभिषेक बच्चनदेखील आहे. भारत - पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी अमिताभ बच्चन राष्ट्रगीत गाणार आहेत. अभिषेक बच्चनने सोशल मिडियावर विमान प्रवासातील फोटो शेअर केला आहे.
 

Web Title: Amitabh Bachchan also holds a tour of Kolkata for the India-Pakistan match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.