karwa chauth 2018 : अभिषेक बच्चनने पत्नी ऐश्वर्या रायसोबत केला करवा चौथचा उपवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 06:23 PM2018-10-27T18:23:36+5:302018-10-27T18:33:35+5:30

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाला ११ वर्षं झाले असून त्यांना एक मुलगी देखील आहे.

Abhishek Bachchan says he’s fasting with Aishwarya Rai on Karva Chauth | karwa chauth 2018 : अभिषेक बच्चनने पत्नी ऐश्वर्या रायसोबत केला करवा चौथचा उपवास

karwa chauth 2018 : अभिषेक बच्चनने पत्नी ऐश्वर्या रायसोबत केला करवा चौथचा उपवास

googlenewsNext

आज करवा चौथ असून अनेक पत्नींनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास केलेला आहे. आजकाल अनेक पती देखील आपल्या पत्नीसोबत उपवास करताना दिसतात. करवा चौथच्या निमित्ताने बायका हातावर मेहेंदी काढतात. एखाद्या नववधूप्रमाणेच सजतात. आजपर्यंत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला करवा चौथ हा सण पाहायला मिळाला आहे. करवा चौथ आणि बॉलिवूड यांचे खूपच जवळचे नाते आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या खऱ्या आयुष्यात देखील करवा चौथ करतात. 

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाला ११ वर्षं झाले असून त्यांना एक मुलगी देखील आहे. तुम्हाला माहीत आहे का, आज ऐश्वर्यासोबत अभिषेकने देखील करवा चौथचा उपवास केला आहे. अभिषेकनेच ट्वीट करून याबाबत सांगितले आहे. अभिषेकने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, सर्व महिलांना करवा चौथच्या शुभेच्छा... पण आपल्या पत्नीसोबत पतीने देखील हा उपवास करण्याची गरज आहे आणि त्यामुळे मी नेहमीच ऐश्वर्यासोबत हा उपवास करतो. 



 

अभिषेक प्रमाणेच टिव्ही अभिनेता गौतम रोडेने देखील पत्नी पंखुडी अवस्थीसोबत उपवास ठेवला आहे. पंखुडी देखील छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गौतम सध्या त्याच्या काल भैरव रहस्य या मालिकेच्या दुसऱ्या सिझनच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यामुळे त्याच्या पत्नीने या खास दिवशी त्याच्या चित्रीकरणाच्या सेटवर जाऊन त्याच्यसोबत वेळ घालवला. गौतम आणि पंखुडीचे लग्न काहीच महिन्यांपूर्वी म्हणजेच ६ फेब्रुवारी २०१८ ला झाले आहे. सूर्यपूत्र कर्ण या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी त्या दोघांची ओळख झाली होती. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत गौतमने सांगितले आहे की, मी माझ्या आयुष्यात कधीच उपवास केला नव्हता. पण मी माझा पहिला उपवास हा पंखुडीसाठी करत आहे याचा मला आनंद होत आहे. 

अभिषेक प्रमाणे सोनम कपूरच्या पतीने देखील करवा चौथच्या निमित्ताने तिच्यासाठी काहीतरी खास केले आहे. त्याने सोनमसोबत त्याच्या हातावर देखील मेहेंदी काढली आहे. या दोघांनी आपल्या हातावर एएस ही त्यांच्या दोघांच्या नावातील पहिली अक्षरे लिहिली असून यासोबत हार्ट शेप काढला आहे.

 
 

Web Title: Abhishek Bachchan says he’s fasting with Aishwarya Rai on Karva Chauth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.