LMOTY2018: तैमूर बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारपेक्षा जास्त कमाई करेल- करिना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 11:47 AM2018-04-11T11:47:19+5:302018-04-11T12:52:05+5:30

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर २०१८' सोहळ्यात करिनाचा मनमोकळा संवाद

taimurs movie will make more money on box office than akshay kumar says kareena kapoor | LMOTY2018: तैमूर बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारपेक्षा जास्त कमाई करेल- करिना

LMOTY2018: तैमूर बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारपेक्षा जास्त कमाई करेल- करिना

googlenewsNext

तैमूरला मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे अक्षय कुमारच्या लोकप्रियतेला धोका आहे, असं अभिनेत्री करिना कपूरनं गमतीनं म्हटलं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर २०१८' या सोहळ्यात करिनानं मनमोकळा संवाद साधत अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली. या सोहळ्याला अभिनेता अक्षय कुमारदेखील उपस्थित होता. यावेळी करिनाला तैमूरला मिळणाऱ्या प्रसिद्धीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना, 'तैमूरला मिळणारी प्रसिद्धी अक्षय कुमारच्या लोकप्रियतेशी स्पर्धा करणारी आहे. त्यामुळे तैमूरमुळे अक्षयला धोका आहे,' असं खुसखुशीत उत्तर करिनानं दिलं.

करिना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्यामुळे तैमूरच्या एकंदर प्रसिद्धीबद्दल करिनाला नेमकं काय वाटतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'लोकमत'नं केला. यावेळी समोर उपस्थित असलेल्या अक्षयला उद्देशून, 'तैमूरला मिळणारी लोकप्रियता अक्षयसाठी धोकादायक ठरु शकते,' असं करिना गमतीनं म्हणाली. 'तैमूरच्या चित्रपटाचं कलेक्शन अक्षयच्या चित्रपटापेक्षा अधिक असेल,' असंही करिनानं म्हटलं. 

चिमुरड्या तैमूरला मिळत असलेल्या प्रसिद्धीचा अभिमान वाटतो की भीती, असाही प्रश्न यावेळी करिनाला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, तैमूरकडून आतापासूनच अपेक्षा बाळगणं भीतीदायक असल्याचं मत तिनं व्यक्त केलं. 'तैमूर अजून खूप लहान आहे. त्याच्यावर आतापासूनच दडपण आणणं चुकीचं आहे. त्याला एखाद्या सामान्य मुलासारखं जीवन जगता यावं, अशी माझी इच्छा आहे. त्यानं मोठं होऊन स्वत: काहीतरी वेगळं करावं आणि मग त्याचं लोकांकडून कौतुक व्हावं, अशी माझी इच्छा आहे,' असंही करिना म्हणाली. 

Web Title: taimurs movie will make more money on box office than akshay kumar says kareena kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.