सहा वर्षांची असताना शूटिंगदरम्यान झाला होता बलात्कार; ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितल्या कटू आठवण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 01:05 PM2018-03-23T13:05:20+5:302018-03-23T13:10:26+5:30

राज कपूर, किशोर कुमार, दिलीप कुमार, देव आनंद, मीना कुमारी यांच्यासोबत डेझी इराणी यांनी काम केलं आहे. 

Rape happened during shooting for six years; The senior actress told me to be sad | सहा वर्षांची असताना शूटिंगदरम्यान झाला होता बलात्कार; ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितल्या कटू आठवण 

सहा वर्षांची असताना शूटिंगदरम्यान झाला होता बलात्कार; ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितल्या कटू आठवण 

googlenewsNext

मुंबई : 50 दशकात बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या एका अभिनेत्रीवर बलात्कार झाला होता. वयाच्या सहाव्या वर्षी शूटिंगदरम्यान बलात्कार झाल्याचा गौप्यस्फोट एका ज्येष्ठ अभिनेत्री डेझी इराणी यांनी केला आहे. सहा वर्षांच्या असताना आणि हम पंछी है एक डाल के या चित्रपटाचं शुटिंग सुरु असताना त्यांच्यावर बलात्कार झाला होता. त्यांचे कौटुंबिक संबंध असलेल्या एका व्यक्तीनं तत्कालिन मद्रासमध्ये हे कृत्य केल्याचा खुलासा अभिनेत्री डेझी इराणी यांनी केला आहे. 

डेझी इराणी यांनी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कटू आठवणी सांगितल्या आहेत. मद्रासमध्ये शुटिंगसाठी आम्ही गेलो होते. त्यावेळी मी बालकलाकार म्हणून हम पंछी है एक डाल या चित्रपटात काम करत होते. त्यावेळी एका व्यक्तीनं माझ्यावर बलात्कार केला. 

तो माणूस आता जिवंत नाही, तो गेला. त्याचं नाव नझीर होतं. सुप्रसिद्ध गायिका जोहराबाई अंबालेवाली यांचा तो नातेवाईक होता. त्यामुळे साहजिकच त्याचे फिल्म जगतात उत्तम संबंध होते. माझ्या आईला कोणत्याही परिस्थितीत मला फिल्मस्टार झालेलं पाहायचं होतं. मी ‘बेबी’ या मराठी सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होते.  मला अजूनही तो अख्खा प्रसंग  आठवतोय. पण ती जीवघेणी वेदना अजूनही माझ्या जशीच्या तशी आठवणीत आहे.

जिनं नया दौर, बूट पॉलिश, जागते रहो, धूल का फूल अशा अनेक चित्रपटांमध्ये राज कपूर, किशोर कुमार, दिलीप कुमार, देव आनंद, मीना कुमारी यांच्यासोबत डेझी इराणी यांनी काम केलं आहे. 

Web Title: Rape happened during shooting for six years; The senior actress told me to be sad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.