मिलिंद सोमण-अंकिता कोवरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 12:13 PM2017-12-19T12:13:36+5:302017-12-19T12:31:32+5:30

मुंबई- सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेता आणि 'आयर्न मॅन' अशी ओळख असणाऱ्या मिलिंद सोमणच्या सगळ्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज तसंच अनेक ...

Milind Soman-Ankita became the head of marriage of Koevera? | मिलिंद सोमण-अंकिता कोवरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला?

मिलिंद सोमण-अंकिता कोवरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला?

googlenewsNext

मुंबई- सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेता आणि 'आयर्न मॅन' अशी ओळख असणाऱ्या मिलिंद सोमणच्या सगळ्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज तसंच अनेक तरूणींच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक बातमी समोर येते आहे. मिलिंद सोमण व त्याची गर्लफ्रेण्ड अंकिता कोवर यांच्या लग्नाचा मुहूर्त निश्चित झाल्याचं समजतं आहे. पुढील वर्षी हे दोघं लग्न करणार असल्याचं समजतं आहे. मिलिंद आणि अंकिता यांच्या वयातील मोठ्या अंतरामुळे ही जोडी चर्चेचा विषय ठरत आहे.

मिलिंद सोमण याने नुकतीच अंकिताच्या कुटुंबीयांची गुवाहाटीमध्ये जाऊन भेट घेतली आहे. स्पॉटबॉय.कॉम या वेबपोर्टलने अंकिताच्या कुटुंबीयांना इम्प्रेस करण्यात मिलिंद यशस्वी झाला असून पुढील वर्षी मिलिंद-अंकिता लग्न करणार आहेत. नुकताच गुवाहाटीमध्ये अंकिताच्या भाच्याचा वाढदिवस साजरा झाला. या कार्यक्रमाला मिलिंदनेही हजरे लावली होती. अंकिताच्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी मिलिंद तेथे गेल्याचं वृत्त आहे. मिलिंद व अंकिताच्या नात्याला कुटुंबीयांनी सहमती दर्शविली असून ते दोघेही पुढील वर्षी लग्न करणार असल्याचं या वेबपोर्टलला सुत्रांकडून समजतं आहे. 

मिलिंद सोमण याने अंकितासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या रिलेशनशीपची माहिती अप्रत्यक्षपणे चाहत्यांना दिली होती. मिलिंद सोमण 52 वर्षांचा आहे तर अंकिता 26 वर्षांची आहे, या दोघांमधील वयाच्या फरकामुळे त्याचं नातं सगळीकडेच चर्चेचा विषय ठरतं. 
मिलिंद सोमणचं हे दुसरं लग्न आहे. 2006 मध्ये त्याने फ्रेंच मॉडेल मायलिन जामपानोईसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र तीन वर्षांच्या आतच दोघं विभक्त झाले.
 

Web Title: Milind Soman-Ankita became the head of marriage of Koevera?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.