Improvement in Dilip Kumar's health | दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा
दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा

मुंबई : लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सायरा बानो यांनी दिली. दिलीप कुमार यांच्या फुप्फुसात संसर्ग झाल्यानंतर त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांना न्यूमोनिया झाल्याचे तपासणीनंतर आढळून आल्याची माहिती सायरा बानो यांनी दिली. ते लवकरच पूर्णपणे बरे होतील, मात्र पूर्वीपेक्षा आता त्यांची तब्येत खूपच चांगली असल्याचे सायरा बानो यांनी सांगितले. दिलीप कुमार यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी काही कालावधी लागेल, असे सांगत सायरा बानो यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या त्यांच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले.


Web Title:  Improvement in Dilip Kumar's health
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.