स्वरा भास्करच्या बॉयफ्रेंडला पाहिलेत का? पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसले दोघे जोडीने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 07:48 AM2018-06-24T07:48:38+5:302018-06-24T07:48:56+5:30

स्वरा भास्करने गेल्या काहीच वर्षांत बॉलिवूडमध्ये तिचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात स्वरा आपल्याला साहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. नंतर तिने एक अभिनेत्री म्हणून तिची एक ओळख निर्माण केली.

Did Swara Bhaskar's boyfriend see? For the first time in the public place, both pairs | स्वरा भास्करच्या बॉयफ्रेंडला पाहिलेत का? पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसले दोघे जोडीने

स्वरा भास्करच्या बॉयफ्रेंडला पाहिलेत का? पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसले दोघे जोडीने

मुंबई : स्वरा भास्करने गेल्या काहीच वर्षांत बॉलिवूडमध्ये तिचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात स्वरा आपल्याला साहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. नंतर तिने एक अभिनेत्री म्हणून तिची एक ओळख निर्माण केली. स्वराने तनू वेड्स मनू, तनू वेड्स मनू २, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटे यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकरल्या आहेत. वीरे दे वेडिंग या चित्रपटामुळे तर सध्या तिच्या नावाची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात तिच्यावर चित्रीत करण्यात आलेला एक बोल्ड सीन चांगलाच वादात सापडला होता. पण हे दृश्य देऊन मी काहीच चुकीचे केले नाही असे स्वराचे स्पष्ट मत होते.

स्वरा गेल्या अनेक वर्षांपासून हिमांशू शर्माला डेट करतेय. हिमांशू हा प्रसिद्ध स्क्रीनप्ले रायटर आहे. त्या दोघांची भेट रांजना या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. या चित्रपटानंतर त्यांनी पुन्हा एकदा तनू वेड्स मनू रिटर्न या चित्रपटाच्या वेळी एकत्र काम केले आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. स्वराने अनेक मुलाखतींमध्ये हिंमांशू सोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. ते दोघे एकमकेांसोबत खूप खूश असल्याचे तिचे म्हणणे आहे. हिमांशू हा स्वरापेक्षा सात वर्षांनी मोठा असून ते दोघे चार वर्षांपासून नात्यात आहेत. स्वरा हिमांशूसोबतच्या नात्याची कबुली देत असली तरी ती आणि हिमांशू खूपच कमी वेळा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसून येतात. नुकतेच त्यांना मुंबई विमानतळावर एकत्र पाहाण्यात आले. हातात हात घालून चालत असताना कॅमेऱ्यामध्ये त्यांना टिपण्यात आले. स्वरा आणि हिमांशू एकत्र राहाणार असल्याच्या बातम्या देखील २०१६ मध्ये आल्या होत्या. स्वराचे आताचे घर लहान असल्यामुळे तिथे त्या दोघांना एकत्र राहाणे शक्य नसल्याने ते दोघे अंधेरीतील यारी रोड येथील मोठाल्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. 

स्वरा ही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते आणि तिथे ती अनेकवेळा वादग्रस्त विधाने करत असते. स्वराचे वडील नेव्ही कमांडर होते. स्वराच्या घरातील कोणीही चित्रपटसृष्टीतील नसूनही तिने आज यश मिळवले आहे. 

Web Title: Did Swara Bhaskar's boyfriend see? For the first time in the public place, both pairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.