थलायवा रजनीकांत यांचा 'काला' या तारखेला होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 11:20 AM2018-04-21T11:20:54+5:302018-04-21T11:22:48+5:30

सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुचर्चीत आगामी 'काला' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.

Dhanush announced Rajnikanth Kaala movie release date | थलायवा रजनीकांत यांचा 'काला' या तारखेला होणार रिलीज

थलायवा रजनीकांत यांचा 'काला' या तारखेला होणार रिलीज

googlenewsNext

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुचर्चित आगामी 'काला' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. याआधी काही वेळा या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली गेली. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला होता. पण आता या सिनेमाची वाट पाहणा-या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बाब आहे. 

'काला' सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा रजनीकांत यांचा जावई अभिनेता धनुष याने केलीये. त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंट ही माहिती शेअर केली आहे. हा 'काला' सिनेमा येत्या जून महिन्यात 7 तारखेला जगभरातील सिनेमाघरांमध्ये रिलीज होणार आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. याआधी हा सिनेमा 27 एप्रिलला रिलीज होणार होता. 

साऊथ सिने इंडस्ट्रीत सुरु असलेल्या संपामुळे हा सिनेमा ठरलेल्या वेळत रिलीज होऊ शकला नाही. या सिनेमात रजनीकांत एका गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात नाना पाटेकर, हुमा कुरेशी, अजंली पाटील हे कलाकारही असणार आहेत.

Web Title: Dhanush announced Rajnikanth Kaala movie release date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.