रोहित शर्माच्या 'त्या' किसवर पत्नी रितिका म्हणते...

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माने भारताला नेतृत्वकौशल्याने जेतेपद पटकावून दिले. मात्र,  त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहितला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 12:04 PM2018-10-16T12:04:19+5:302018-10-16T12:04:37+5:30

whatsapp join usJoin us
WATCH: Rohit Sharma kissed by fan during Vijay Hazare match; here's how wife Ritika Sajdeh reacted | रोहित शर्माच्या 'त्या' किसवर पत्नी रितिका म्हणते...

रोहित शर्माच्या 'त्या' किसवर पत्नी रितिका म्हणते...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माने भारताला नेतृत्वकौशल्याने जेतेपद पटकावून दिले. मात्र,  त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहितला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे रोहितने हा वेळ सत्कार्णी लावण्याचे ठरवले आणि विजय हजारे करंडकामध्ये मुंबईकडून खेळण्याचे ठरवले. मुंबई आणि बिहार यांच्यातील सामन्यात घडलेल्या एका प्रसंगाने रोहितची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. 

रोहितने या सामन्यात नाबाद 33 धावांची खेळी साकारत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहित जेव्हा 21 धावांवर खेळत होता तेव्हा हा प्रकार मैदानात घडला. एक षटक संपल्यावर रोहित आपल्या सहकाऱ्याला भेटायला जात होता. त्यावेळी एक चाहता मैदानात घुसला आणि रोहितकडे गेला. रोहितला या चाहत्याचा कोणताच अंदाज नव्हता, त्यामुळे सुरुवातीला रोहित घाबरला. तो चाहता थेट गेला आणि त्याने चक्क रोहितचे पाय धरले. पण, तो इथवरच थांबला नाही, त्याने रोहितचा किस करण्याचा प्रयत्न केला. 

चाहत्याच्या या प्रतापामुळे रोहितची पत्नी रितिका सजदेह आणि सहकारी युजवेंद्र चहल यांना राग आला आहे. 
 



या प्रकाराचा वृत्तपत्रात छापून आलेला फोटो रितिकाने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि चहलला टॅग करत तिने लिहिले की,'' तुला आणि मला दोघांना स्पर्धक मिळाला.''

त्यावर चहलने ''वहिनी हे काय सुरू आहे?'' असा रिप्लाय दिला. 

Web Title: WATCH: Rohit Sharma kissed by fan during Vijay Hazare match; here's how wife Ritika Sajdeh reacted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.