VIDEO- धोनीची मुलगी झिवासाठी विराटने काढला मांजरीचा आवाज; रियुनियनचा व्हिडीओ केला शेअर

कॅप्टन कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 09:23 AM2017-10-09T09:23:06+5:302017-10-09T09:26:30+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli's Reunion With MS Dhoni's Daughter Ziva | VIDEO- धोनीची मुलगी झिवासाठी विराटने काढला मांजरीचा आवाज; रियुनियनचा व्हिडीओ केला शेअर

VIDEO- धोनीची मुलगी झिवासाठी विराटने काढला मांजरीचा आवाज; रियुनियनचा व्हिडीओ केला शेअर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देकॅप्टन कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवासोबत कोहलीचे सेल्फी अनेक वेळा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. रांचीत पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतर कोहलीने धोनीच्या रांचीतल्या घराला भेट दिली.

मुंबई- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचं लहान मुलांसाठी असलेलं प्रेम आपण याआधीही पाहिलं आहे. क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक असणाऱ्या विराटची हळवी बाजूही आपण अनेकदा पाहिली आहे. आता कॅप्टन कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विराटच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर नेटीझन्सने चांगलची पसंती दर्शविली आहे. महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवासोबत कोहलीचे सेल्फी अनेक वेळा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. रांचीत पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतर कोहलीने धोनीच्या रांचीतल्या घराला भेट दिली. यावेळी धोनीची मुलगी झिवासोबतचा एक व्हिडीओ त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कोहली आणि झिवाची धमाल मस्ती पाहायला मिळते आहे. कोहली आणि झिवाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटीझनच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओमध्ये कोहली आणि झिवा मस्त गप्पा मारताना दिसत आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीने झिवासाठी मांजरीचा आवाजही काढल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. 


विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 'माझं झिवासोबर रियुनियन. अशा निष्पाप मुलीबरोबर राहणं यापेक्षा दुसरं भाग्य नाही, असं कॅप्शन विराटने व्हिडीओ शेअर करताना दिलं आहे. कॅप्टन विराट कोहलीने झिवासोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी मार्च महिन्यात विराटने झिवाबरोबरचा सेल्फी पोस्ट केला होता. झिवा माझ्या मोबाइल सोबत खेळते आहे आणि मोबाइल कसा वापरयाचा हे तिला चांगलं माहिती असल्याचं विराटने तो फोटो शेअर करताना कॅप्शन दिलं होतं. विराट आणि झिवाचा तो फोटो तेव्हाही सोशल मीडियावर सगळ्यांच्या पसंतीस उतरला होता. 

वन-डे मालिकेत ऑस्ट्रेलियावर ४-१ ने मात केल्यानंतर भारताने टी-२० सामन्यांच्या मालिकेतही १-० अशी आघाडी घेतली आहे. ३ सामन्यांच्या मालिकेत आता २ सामने खेळणं बाकी आहे. पण ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दुखापतींमुळे बेजार असून संघातले महत्वाचे खेळाडू हे अॅशेल मालिकेच्या तयारीसाठी मायदेशी परतले आहेत. त्यामुळे आगामी सामन्यांत भारतीय संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Web Title: Virat Kohli's Reunion With MS Dhoni's Daughter Ziva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.