'ती' कुरुप होती म्हणून 'डेट'वरून पळालो, विराट कोहलीचा व्हिडीओ व्हायरल

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांनी कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करून रोष ओढावून घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 06:41 PM2019-01-13T18:41:26+5:302019-01-13T18:41:56+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli calls girl 'ugly' in throwback video, gets trolled | 'ती' कुरुप होती म्हणून 'डेट'वरून पळालो, विराट कोहलीचा व्हिडीओ व्हायरल

'ती' कुरुप होती म्हणून 'डेट'वरून पळालो, विराट कोहलीचा व्हिडीओ व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांनी कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करून रोष ओढावून घेतला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दोघांना निलंबित केले आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावून घेतले. या प्रकरणावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही बोलणे टाळले आहे, परंतु आता व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओत कोहलीकडूनही अशी चूक झाल्याचे समोर आले आहे. 

त्या कार्यक्रमात अनुषा दांडेकरने कोहलीला 'डेट' बद्दल विचारले असता तो म्हणाला,''होय मी एका डेटवर गेलो होतो. पण, ती पाच मिनिटांत संपली. मी त्या मुलीला पाहिले आणि तेथून पळ काढला.'' असं का केलं हे विचारल्यावर कोहली म्हणाला,''ती मुलगी दिसायला कुरुप होती.''
ऑस्ट्रेलियाच्या एका पत्रकाराने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहा... 



 दरम्यान,  विधानानंतर पांड्या व राहुल यांची क्रिकेट कारकीर्द धोक्यात आली आहे. महिलांचा अपमान करणाऱ्या त्या वक्तव्यानंतर पांड्या व राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तोपर्यंत त्यांना बीसीसीआय, आयसीसी आणि राज्य संघटनांच्या कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. प्रशासकीय समितीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहा सदस्यीय समितीही नेमली आहे आणि त्यानंतर या दोघांना कोणती शिक्षा देण्यात यावी याबाबतचा निर्णय होईल. पांड्या व राहुल यांच्यावर काही महिन्यांच्या बंदीची कारवाई झाल्यास त्यांना इंडियन प्रीमिअर लीग आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागेल. प्रशासकीय समिती सदस्य आणि माजी क्रिकेटपटून डायना एडुल्जी यांनी हे दोघं वर्ल्ड कप खेळू शकणार नाही, असे संकेत दिले होते.
 

Web Title: Virat Kohli calls girl 'ugly' in throwback video, gets trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.