शुभमंगल सावधान! 'विरूष्का' अखेर विवाहबंधनात, विराट-अनुष्काने इटलीत घेतले सात फेरे

गेल्या अनेक दिवसांपासून भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर हे दोघं विवाहबंधनात अडकले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 21:54 IST2017-12-11T18:51:00+5:302017-12-11T21:54:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
virat kohli anushka sharma wedding kohli ties the knot with anushka | शुभमंगल सावधान! 'विरूष्का' अखेर विवाहबंधनात, विराट-अनुष्काने इटलीत घेतले सात फेरे

शुभमंगल सावधान! 'विरूष्का' अखेर विवाहबंधनात, विराट-अनुष्काने इटलीत घेतले सात फेरे

मुंबई:  गेल्या अनेक दिवसांपासून भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर हे दोघं विवाहबंधनात अडकले आहेत. इटलीच्या बोर्गो फिनोचितो हाॅटेलमध्ये दोघांचं लग्न झालं. हे हाॅटेल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडीचं हाॅटेल म्हणूनही ओळखलं जातं. जगातल्या 20 महागड्या हाॅटेल्सपैकी ते एक आहे. स्वतः विराट आणि अनुष्काने याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. नवी दिल्लीत 21 डिसेंबरला ग्रँड रिसेप्शन होणार आहे तर मुंबईत 26 डिसेंबर रोजी दोघांच्या मित्रांसाठी खास रिसेप्शन असणार आहे.

''आज आम्ही एकमेकांसोबत कायमस्वरूपी प्रेमबंधनात अडकण्याचं आश्वासन घेतलं....हे वृत्त तुमच्यासोबत शेअर करताना मनापासून खूप आनंद होतोय... हा दिवस कुटुंबिय, मित्र-मैत्रिणी आणि चाहत्यांच्या शुभेच्छांनी आणखी खास होईल...आमच्या जीवन प्रवासातील महत्वाचा हिस्सा राहिल्याबद्दल सर्वांचे आभार'' असं ट्विट दोघांनी केलं आहे'  



विराटचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी सीके नायडू अंडर 23 सेमी फायनलमधून सुट्टी घेतल्यामुळे या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं जात होतं.

यापूर्वी येत्या 9 ते 12 डिसेंबर दरम्यान दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार असल्याचं वृत्त होतं, मात्र अनुष्का शर्माच्या माध्यम प्रतिनिधीनी त्यावेळी हे वृत्त फेटाळले होते.

विराट-अनुष्काची ब्युटीफुल लव्ह स्टोरी चार वर्षांपूर्वी सुरु झाली होती. त्यावेळी हे दोघे पहिल्यांदा एका कमर्शिअल अॅडमध्ये एकत्र झळकले होते.

 

Web Title: virat kohli anushka sharma wedding kohli ties the knot with anushka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.