फिरकीपटूंवर बळी घेण्याचे दडपण राहील

इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेची निर्णायक लढत सहज जिंकल्यानंतर टीम इंडिया आणखी एका परीक्षेसाठी सज्ज आहे. भारतीय संघाने आठवी टी-२० मालिका जिंकली आहे. त्यामुळे संघाच्या आत्मविश्वासाची कल्पना येते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 05:32 AM2018-07-12T05:32:26+5:302018-07-12T05:32:47+5:30

whatsapp join usJoin us
 There will be a lot of pressure on the spinners to take wickets | फिरकीपटूंवर बळी घेण्याचे दडपण राहील

फिरकीपटूंवर बळी घेण्याचे दडपण राहील

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण

इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेची निर्णायक लढत सहज जिंकल्यानंतर टीम इंडिया आणखी एका परीक्षेसाठी सज्ज आहे.
भारतीय संघाने आठवी टी-२० मालिका जिंकली आहे. त्यामुळे संघाच्या आत्मविश्वासाची कल्पना येते. संघ अडचणीत असताना विजय मिळवल्यामुळे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळते.
पाठीच्या दुखापतीमुळे भुवी संघाबाहेर असल्यानंतर अनुभव नसलेल्या भारतीय माऱ्याविरुद्ध इंग्लंडने शानदार सुरुवात केली, पण कुलदीपने मॅन्चेस्टनमध्ये सामना जिंकून देणारी कामगिरी केल्यानंतरही त्याला बाहेर बसावे लागले. हा आश्चर्यचकित करणारा निर्णय होता, पण यजुवेंद्र चहल वन-डे मालिकेत मोठी भूमिका बजावेल, असा मला विश्वास आहे.
१० षटकांत १०० धावांची मजल मारल्यानंतर इंग्लंडची नजर २२५ धावसंख्येवर होती, पण भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. पहिल्या षटकांत २२ धावा बहाल केल्यानंतर हार्दिकने दुसºया टोकाकडून गोलंदाजी करताना टप्प्यामध्ये बदल केला आणि चार बळी घेतले. इंग्लंडने अपेक्षेपेक्षा २०-२५ धावा कमी फटकावल्या असला तरी मालिका बरोबरीत असताना २०० धावांचे लक्ष्य सोपे नसते.
खेळपट्टी पाटा होती, मैदान
लहान होते या बाबीनंतरही रोहितने ज्या पद्धतीने सुरुवात केली त्यामुळे एकच निकाल शक्य होता आणि तो म्हणजे भारताचा विजय. रोहितने पहिल्या चेंडूपासून आपला निर्धार स्पष्ट केला. तो या निर्धाराने उतरल्यानंतर मोजक्याच वेळी तो आपली भूमिका न बजावता परतला असल्याचे दिसून आले आहे.
आता ५० षटकांच्या लढती प्रारंभ होत आहे. उभय संघांदरम्यान शानदार खेळ अनुभवाला मिळण्याची आशा आहे. इंग्लंड संघ अव्वल स्थानी आहे आणि बुमराहच्या अनुपस्थितीमुळे थोडा कमकुवत झालेल्या भारताच्या वेगवान माºयाने त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. भुवीबाबत साशंकता आहे. सिद्धार्थ कौलला संधी मिळू शकते. मनगटाच्या जोरावर चेंडू वळविणाºया फिरकीपटूंवर डावाच्या मधल्या काळात बळी घेण्याचे दडपण राहील. भारताची फलंदाची बाजू मजबूत असून संघात बदल बघायला मिळण्याची शक्यता कमी आहे. संघात दिग्गज व अनुभवी फलंदाज आहे. अनेक फलंदाजांना टी-२० मध्ये विशेष काही करण्याची संधी मिळाली नाही. के.एल.
राहुलने तिसºया क्रमांकावर फलंदाजी करावी, असे मला वाटते. तो तिस-या क्रमांकावर खेळला तर विराटला चौथ्या क्रमांकावर खेळावे लागेल आणि त्यामुळे इंग्लंडला संघर्ष करावा लागेल.

Web Title:  There will be a lot of pressure on the spinners to take wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.