सरावाची अधिक संधी पाहिजे होती : रवी शास्त्री

‘विदेशातील परिस्थितींमुळे आम्ही मालिकेत पिछाडीवर पडलो. या दौ-याची सुरुवात दहा दिवस आधीपासून करायला पाहिजे होती, जेणेकरून खेळाडूंनी येथील वातावरण आणि परिस्थितींशी स्वत:ला जुळवून घेतले असते,’ अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 02:07 AM2018-01-23T02:07:39+5:302018-01-23T02:07:51+5:30

whatsapp join usJoin us
 There was more opportunity for practice: Ravi Shastri | सरावाची अधिक संधी पाहिजे होती : रवी शास्त्री

सरावाची अधिक संधी पाहिजे होती : रवी शास्त्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जोहान्सबर्ग : ‘विदेशातील परिस्थितींमुळे आम्ही मालिकेत पिछाडीवर पडलो. या दौ-याची सुरुवात दहा दिवस आधीपासून करायला पाहिजे होती, जेणेकरून खेळाडूंनी येथील वातावरण आणि परिस्थितींशी स्वत:ला जुळवून घेतले असते,’ अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-२ असे पिछाडीवर पडल्यानंतर बुधवारपासून भारतीय संघ तिसरा व अंतिम कसोटी सामना खेळण्यास मैदानावर उतरले. हा सामना जिंकून आपली प्रतिष्ठा जपण्याचे मुख्य आव्हान भारतापुढे असेल. संघाच्या सराव सत्रानंतर शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘घरच्या परिस्थितींशी आम्ही परिचित आहोत. आम्हाला आमच्या मैदानावर झुंजण्याची आवश्यकता नव्हती, पण आम्ही तिथेही झुंजलो आणि चांगले पुनरागमन केले. जर येथे सराव करण्यास आणखी १० दिवस मिळाले असते, तर खूप बदल पाहायला मिळाले असते.’ (वृत्तसंस्था)
‘आम्ही कोणतेही कारण देऊ इच्छित नाही. आम्ही ज्या खेळपट्टीवर खेळलो ती दोन्ही संघासाठी तयार करण्यात आली होती आणि दोन्ही कसोटी सामन्यांत आम्ही २० बळी मिळवले. यामुळे आम्हाला दोन्ही सामन्यांत विजयाची संधी मिळाली होती. जर आमची आघाडीची फळी यशस्वी झाली, तर तिसरा सामनाही चांगला होईल,’ असेही शास्त्री यांनी म्हटले.
जर अजिंक्य रहाणे पहिल्या कसोटीत खेळला असता आणि अपयशी ठरला असता, तर तुम्ही असेच विचारले असते की, रोहितला का नाही खेळवले. रोहित खेळला आणि चांगली कामगिरी करु न शकल्याने तुम्ही मला अजिंक्यला का खेळवले नाही, असे विचारत आहात. हीच गोष्ट वेगवान गोलंदाज निवडीवरही लागू होत आहे. तुमच्याकडे पर्याय आहेत. संघ व्यवस्थापन सर्वोत्कृष्ट पर्यायावर विचार करत आहे. त्यानुसारच संघ निवडला जाईल.
- रवी शास्त्री, प्रशिक्षक
आफ्रिका दौºयासाठी कसोटी स्पेशालिस्ट खेळाडूंना आधी पाठवण्याबाबत विचारले असता शास्त्री म्हणाले की, ‘आधी असा विचार केला होता; पण एक संघ म्हणून सगळे एकत्रित आले नसते. हे विचार मागे ठेवून मी सांगू इच्छितो की यापुढे कोणत्याही दौ-यासाठी संघाला दोन आठवड्यांआधी पाठवावे. दुर्दैवाने आफ्रिका दौ-याआधी श्रीलंकेविरुद्ध आमचे सामने होते. पण मला खात्री आहे, की यापुढे संघाचे वेळापत्रक आखण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा विचार केला जाईल.’
पहिल्या दोन सामन्यांतील गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीचे कौतुक करताना शास्त्री यांनी सांगितले की, ‘कोणालाच अपेक्षा नव्हती की आमचे गोलंदाज इतकी चांगली कामगिरी करत २० बळी मिळवतील. आतापर्यंत दौºयात हीच आमच्यासाठी सर्वांत मोठी सकारात्मक बाब राहिली आहे. आम्ही येथे आमच्या चुकांमधून शिकण्यास आलो आहोत. संघ विदेशामध्ये सामना जिंकण्याच्या संधी निर्माण करत असल्याने डेÑसिंग रूममध्ये आत्मविश्वास उंचावला आहे.’

Web Title:  There was more opportunity for practice: Ravi Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.