शिखर धवन आणि हरभजन सिंग यांच्याकडून एकमेकांचं बारसं

भारतीय संघाचा सलामीवर शिखर धवन हा मैदानावर आणि मैदानाबाहेर आपल्या विनोदी वर्तनाने नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 10:19 AM2018-10-15T10:19:53+5:302018-10-15T10:20:03+5:30

whatsapp join usJoin us
Shikhar Dhawan, Harbhajan Singh give new nicknames to each other  | शिखर धवन आणि हरभजन सिंग यांच्याकडून एकमेकांचं बारसं

शिखर धवन आणि हरभजन सिंग यांच्याकडून एकमेकांचं बारसं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतीय संघाचा सलामीवर शिखर धवन हा मैदानावर आणि मैदानाबाहेर आपल्या विनोदी वर्तनाने नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेत आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्या फॅन्सचे चांगले मनोरंजन होत असते. धवनच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टमुळे त्याची पुन्हा चर्चा आहे. ही चर्चा आहे ती धवनच्या नामकरणाची... भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि धवन यांनी एकमेकांना टोपण नाव देताना बारसं केलं.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत धवनचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. या मालिकेत पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. इंग्लंड मालिकेतील निराशाजनक कामगिरी पाहता धवनला संघाबाहेर बसावे लागले. या फावल्या वेळेत धवन इंस्टाग्रामवर अॅक्टीव्ह झाला आहे. 

धवनने नुकताच एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला. त्यावर हरभजनने 'डाकू' असे नामकरण केले. त्यावर धवन याने रिप्लाय देताना 'जग्गा जट' असे नाव दिले.  
 

View this post on Instagram


वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी धवनचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे आणि ही मालिका 21 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 
 

Web Title: Shikhar Dhawan, Harbhajan Singh give new nicknames to each other 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.