ठळक मुद्देदिल्लीच्या विजय शंकरने युसूफ पठाणचा शून्यावर झेल सोडला आणि त्याने 12 चेंडूंत नाबाद 27 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हैदराबादने पुन्हा पटकावले अव्वल स्थान, दिल्लीवर मात
हैदराबाद : ' कॅचेस विन्स दी मॅचेस' असे क्रिकेटमध्ये म्हटले जाते आणि त्याचाच प्रत्यय सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्या सामन्यात आला. दिल्लीने अॅलेक्स हेल्सला 9 धावांवर जीवदान दिले, त्याने 45 धावा केल्या. त्यानंतर दिल्लीच्या विजय शंकरने युसूफ पठाणचा शून्यावर झेल सोडला आणि त्याने 12 चेंडूंत नाबाद 27 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉचे अर्धशतक आणि श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीच्या जोरावर 163 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सात विकेट्स राखत हा सामना जिंकला. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करण्यास उतरलेल्या सनरायजर्सच्या सलामीवीरांनी पहिल्या गड्यासाठी ५४ चेंडूत ७६ धावांची भागीदारी केली. अॅलेक्स हेल्स याने ३१ चेंडूतच ४५ धावा केल. तर शिखर धवन याने ३० चेंडूत ३३ धावा केल्या. त्यानंतर केन विल्यम्सन याने संघाला विजयासमीप नेले. सनरायजर्सला आवश्यक ती धावगती राखता आली नाही. त्यामुळे दिल्लीच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या मात्र युसुफ पठाण याने १२ चेंडूतच २७ धावांचा तडाखा देत संघाला विजय मिळवून दिला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार लगावले.
तत्पूर्वी दिल्ली डेअरडेविल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला दिल्लीकडून धडाकेबाज ग्लेन मॅक्सवेल आणि युवा फलंदाज पृथ्वी शॉ हे सलामीला उतरले. मात्र दुसऱ्या षटकांत ग्लेन मॅक्सवेल धावबाद झाला. त्यानंतर पृथ्वी शॉने सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण केले. अनुभवी भुवनेश्वर कुमार वगळता त्याने इतर गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. सिद्धार्थ कौलच्या एकाच षटकात त्याने एक षटकार आणि नंतर सलग तीन चौकार लगावले.३६ चेंडूच्या आपल्या खेळीत शॉने ३ षटकार आणि सहा चौकार लगावले. कर्णधार श्रेयस अय्यर याने देखील त्याला चांगली साथ दिली. त्याने ३६ चेंडूत ४४ धावा केल्या.
11.35 PM : हैदराबादचा दिल्लीवर सात विकेट्स राखून विजय
11.26 PM : हैदराबादला विजयसाठी 6 चेंडूंत 14 धावांची गरज
11.19 PM : हैदराबादला विजयसाठी 12 चेंडूंत 28 धावांची गरज
11.15 PM : हैदराबादला तिसरा धक्का; मनीष पांडे बाद
10.58 PM : हैदराबाद 15 षटकांत 2 बाद 115
10.40 PM : हैदराबादला मोठा धक्का; शिखर धवन बाद
- अमित मिश्राने धवनला त्रिफळाचीत करत हैदराबादला मोठा धक्का दिला. धवनने 30 चेंडूंत 2 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 33 धावा केल्या.
10.36 PM : हैदराबाद 10 षटकांत 1 बाद 82
10.28 PM : हैदराबादला पहिला धक्का; अॅलेक्स हेल्स बाद
- अमित मिश्राने अॅलेक्स हेल्सला त्रिफळाचीत करत हैदराबादला पहिला धक्का दिला. हेल्सने 31 चेंडूंत प्रत्येकी तीन चौकार आणि षटकार लगावत 45 धावा केल्या.
10.18 PM : अव्हेश खानच्या सहाव्या षटकात चार षटकारासह हैदराबादने लुटल्या 27 धावा.
- सहाव्या षटकात शिखर धवन आणि अॅलेक्स हेल्स यांनी प्रत्येकी दोन षटकार फटकावत तब्बल 27 धावा फटकावल्या.
10.16 PM : अॅलेक्स हेल्सच्या षटकारासह हैदराबादचे अर्धशतक पूर्ण
10.08 PM : हैदराबाद 5 षटकांत बिनबाद 34
9.55 PM : अॅलेक्स हेल्सला 9 धावांवर जीवदान
- अव्हेश खानच्या दुसऱ्या षटकात अॅलेक्स हेल्सचा झेल ग्लेन मॅक्सवेलने सोडला. त्यावेळी हेल्स 9 धावांवर होता.
पृथ्वी आणि श्रेयसच्या फटकेबाजीनंतरही दिल्लीचे 163 धावांवर समाधान
हैदराबाद : पृथ्वी शॉचे तुफानी अर्धशतक आणि श्रेयस अय्यरची फटकेबाजी पाहता दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ जवळपास दोनशे धावा करेल, असे वाटत होते. पण हे दोघे बाद झाले आणि दिल्लीची धावगती मंदावली. त्यानंतर अन्य फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही आणि दिल्लीला 163 धावांवर समाधान मानावे लागले. पृथ्वीच्या फटकेबाजीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. पृथ्वीने 36 चेंडूंत 6 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 65 धावा केल्या. दिल्लीचा कर्णधार श्रेयसने 36 चेंडूंत 3 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 44 धावा केल्या.
9.30 PM : दिल्लीचे हैदराबादपुढे 164 धावांचे आव्हान
9.18 PM : दिल्लीला पाचवा धक्का; रीषभ पंत धावबाद
- रशिद खानने रीषभ पंतला पायचीत पकडत दिल्लीला पाचवा धक्का दिला. पंतने 19 चेंडूंत 19 धावा केल्या.
9.14 PM : दिल्लीला चौथा धक्का; नमन ओझा धावबाद
- रीषभ पंतबरोबर योग्य समन्वय न झाल्याने नमन आेझाला धावचीत होऊन तंबूत परतावे लागले.
9.06 PM : दिल्लीला तिसरा धक्का; श्रेयस 44 धावांवर बाद
- सिद्धार्थ कौलच्या सोळाव्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात श्रेयस अय्यर बाद झाला. श्रेयसने 36 चेंडूंत 3 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 44 धावा केल्या.
8.49 PM : बाराव्या षटकात दिल्लीचे शतक पूर्ण
8.42 PM : दिल्लीला मोठा धक्का; पृथ्वी शॉ बाद
- रशिद खानला अकराव्या षटकात मोठा फटका मारताना पृथ्वी बाद झाला. पृथ्वीने 36 चेंडूंत 6 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 65 धावा केल्या.
8.38 PM : मुंबईकरांची जोडी जमली; दिल्ली 10 षटकांत 1 बाद 95
- मुंबईकर श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांची जोडी चांगलीच जमली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने 10 षटकांत 95 धावा केल्या.
8.28 PM : पृथ्वी शॉने झळकावले 25 चेंडूंत अर्धशतक
- पृथ्वीने पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 25 चेंडूंत अर्धशतक झळकावले. पृथ्वीचे आयपीएलमधले हे दुसरे अर्धशतक ठरले.
8.23 PM : पृथ्वी शॉ तळपला; सहाव्या षटकात तीन चौकार आणि एक षटकार फटकावला
- हैदराबादचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलच्या सहाव्या षटकात पृथ्वीने तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 20 धावा लूटल्या.
8.18 PM : दिल्ली पाच षटकांत 1 बाद 40
8.05 PM : दिल्लीला पहिला धक्का; मॅक्सवेल धावचीत
- संदीप शर्माच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉने सरळ फटका मारला. हा चेंडू संदीपच्या हाताला लागला आणि यष्ट्यांवर आदळला. यावेळी मॅक्सवेल क्रीझमध्ये नव्हता. त्यामुळे दुर्देवीरीत्या तो धावचीत झाला. त्यामुळे सलामीची संधी मिळालेल्या मॅक्सवेलला फक्त दोन धावा करता आल्या.
8.01 PM : ग्लेन मॅक्सवेलला दिल्लीने दिली सलामीची संधी
7.45 PM : दिल्लीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली
अव्वल स्थानावर जाण्याचे हैदराबादचे लक्ष्य, दिल्लीबरोबर आज सामना
चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करत सनरायझर्स हैदराबादकडून अव्वल स्थान हिरावून घेतले. त्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धचा सामना जिंकून पुन्हा अव्वल स्थान पटकावण्याचे हैदराबादचे लक्ष्य असेल. दुसरीकडे आयपीएलमधील आव्हान कायम राखण्यासाठी दिल्लीसाठी हा सामना महत्वाचा असेल.
दोन्ही संघ