RR vs SRH , IPL 2018 : सनरायझर्सचा रोमांचक विजय, रहाणेचे अर्धशतक व्यर्थ

यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांनी आज पुन्हा एकदा आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 03:44 PM2018-04-29T15:44:44+5:302018-04-30T01:20:40+5:30

whatsapp join usJoin us
RR vs SRH, IPL 2018 LIVE: Sunrisers Hyderabad won the toss & elected Bat first | RR vs SRH , IPL 2018 : सनरायझर्सचा रोमांचक विजय, रहाणेचे अर्धशतक व्यर्थ

RR vs SRH , IPL 2018 : सनरायझर्सचा रोमांचक विजय, रहाणेचे अर्धशतक व्यर्थ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जयपूर : केन विल्यम्सनचे अर्धशतक आणि कुशल नेतृत्व, गोलंदाजांचा अचूक मारा आणि त्यांना क्षेत्ररक्षकांची मिळालेली साथ यांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाने रविवारी राजस्थान रॉयल्सचा ११ धावांनी पराभव करीत आयपीएलच्या ११ व्या पर्वात विजयी मोहीम कायम राखली. विल्यम्सन (४३ चेंडू, ६३ धावा) आणि अ‍ॅलेक्स हेल्स (३९ चेंडू, ४५ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली असली तरी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाºया सनरायझर्स संघाला ७ बाद १५१ धावांचीच मजल मारता आली. रॉयल्स संघासाठी मात्र ही धावसंख्याही मोठी ठरली. कर्णधार अजिंक्य रहाणे (५३ चेंडू, नाबाद ६५ धावा) याने डावाची सुरुवात करताना अखेरपर्यंत खेळपट्टीवर तळ ठोकला, पण त्याला आक्रमक खेळी करता आली नाही. संजू सॅम्सनने (३० चेंडू, ४० धावा) फटकेबाजी केली, पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याचे प्रयत्न अपुरेच पडले. सनरायझर्सच्या अचूक माºयापुढे राजस्थान रॉयल्सचा डाव अखेर ६ बाद १४० धावांत रोखला गेला. सनरायझर्सचा हा सलग तिसरा व एकूण आठ सामन्यांतील सहावा विजय आहे. आता हा संघ एकूण १२ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. राजस्थान रॉयल्सचा सात सामन्यांतील हा चौथा पराभव आहे. त्यांच्या खात्यावर सहा गुणांची नोंद आहे. उभय संघांच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. सनरायझर्सतर्फे सिद्धार्थ कौलने २३ धावांच्या मोबदल्यात २, तर संदीप शर्माने ४ षटकांत केवळ १५ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला. बासिल थम्पीचा (२ षटकांत २६ धावा) अपवाद वगळता अन्य गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी अखेरच्या पाच षटकांमध्ये केवळ ३१ धावा बहाल करताना चार बळी घेतले. त्यांच्यातर्फे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (३-२६) आणि आॅफस्पिनर कृष्णप्पा गौतम (२-१८) यशस्वी गोलंदाज ठरले. राजस्थान रॉयल्सचे फलंदाज धावा वसूल करण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. सॅम्सनच्या खेळीमुळे संघाला पॉवरप्लेमध्ये ४३ धावांची मजल मारता आली. राहुल त्रिपाठी (४) तिसºया षटकात बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या सॅम्सनने थम्पीच्या त्यानंतरच्या षटकात दोन चौकार व एक षटकार लगावला. रहाणे व सॅम्सन यांनी दुसºया विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली, त्यात रहाणेचे योगदान केवळ १८ धावांचे होते. सॅम्सन मिडविकेटला झेल देत माघारी परतल्यानंतर ही भागीदारी संपुष्टात आली. इंग्लंडचे दिग्गज खेळाडू बेन स्टोक्स (०) व जोस बटलर (१०) यांना मोठी खेळी करता आली नाही. रहाणेने एक टोक सांभाळून फलंदाजी केली, पण त्याला आवश्यक धावगती राखता आली नाही. त्याने ४२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. राशिद खानच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत प्रथमच आक्रमक फटका लगावला. अखेरच्या दोन षटकांमध्ये राजस्थान रॉयल्सला विजयासाठी २७ धावांची गरज होती. त्या वेळी सनरायझर्सने शानदार क्षेत्ररक्षण करीत राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना रोखले. अखेरच्या षटकांत रॉयल्सला २१ धावांची गरज होती, पण थम्पीने केवळ ९ धावा दिल्या.  

धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : अ‍ॅलेक्स हेल्स झे. सॅम्सन गो. गौतम ४५, शिखर धवन त्रि. गो. गौतम ०६, केन विल्यम्सन झे. बटलर गो. सोढी ६३, मनीष पांडे झे. रहाणे गो. उनाडकट १७, शाकिब-अल-हसन त्रि. गो. आर्चर ०६, युसूफ पठाण झे. कुलकर्णी गो. आर्चर ०२, वृद्धिमान साहा नाबाद ११, राशिद खान झे. स्टोक्स गो. आर्चर ०१, बासिल थम्पी नाबाद ००. अवांतर (०१). एकूण : २० षटकांत ७ बाद १५१. बाद क्रम : १-१७, २-१०९, ३-११६, ४-१३३, ५-१३७, ६-१४३, ७-१५०. गोलंदाजी : के. गौतम ४-०-१८-२, धवल कुलकर्णी २-०-२०-०, जोफ्रा आर्चर ४-०-२६-३, जयदेव उनाडकट ३-०-३२-१, ईश सोढी ३-०-२५-१, बेन स्टोक्स ३-०-२०-०, महिपाल लॅमरोर १-०-८-०.
राजस्थान रॉयल्स :- अजिंक्य रहाणे नाबाद ६५, राहुल त्रिपाठी त्रि. गो. संदीप शर्मा ०४, संजू सॅम्सन झे. हेल्स गो. कौल ४०, बेन स्टोक्स त्रि. गो. पठाण ००, जोस बटलर झे. धवन गो. राशिद खान १०, महिपाल लॅमरोर झे. साहा गो. कौल ११, के. गौतम झे. धवन गो. थम्पी ०८, जोफ्रा आर्चर नाबाद ०१. अवांतर (०१). एकूण : २० षटकांत ६ बाद १४०. बाद क्रम : १-१३, २-७२, ३-७३, ४-९६, ५-१२८, ६-१३९. गोलंदाजी : संदीप शर्मा ४-०-१५-१, शाकिब ४-०-३०-०, थम्पी २-०-२६-१, सिद्धार्थ कौल ४-०-२३-२, राशिद खान ४-०-३१-१, युसूफ पठाण २-०-१४-१. 

7.25 PM : अजिंक्य रहाणेची एकाकी झुंज अपयशी, हैदराबादची राजस्थानवर 11 धावांनी मात

- 151 धावांच्या माफक आव्हानाचा बचाव करताना हैदराबादच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. भेदक गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादने राजस्थानवर 11 धावांनी मात केली. 

7.24 PM : कृष्णाप्पा गौतम बाद 

- शेवटच्या षटकात फटकेबाज कृष्णाप्पा गौतम 4 चेंडूत 8 धावा काढून बेसिल थम्पीची शिकार झाला. 

7. 16 PM : राजस्थानला पाचवा धक्का 

- मणिपाल लोमरार 11 धावांवर बाद, राजस्थानला शेवटच्या 10 चेंडूत 24 धावांची गरज

7.10 PM : अजिंक्य रहाणेचे अर्धशतक पूर्ण

6.53 PM  : राजस्थानचे शतक फलकावर 

-  एक बाजू लावून धरणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 14.5 षटकांत शंभरीपार मजल मारली आहे.

6.50 PM : राजस्थान रॉयल्सला चौथा धक्का बसला असून, बेन स्टोक्सपाठोपाठ जोस बटलरही माघारी परतला आहे. 

6.34 PM : स्टोक्सची विकेट काढत युसूफ पठाणने राजस्थानला हादरवले, स्टोक्स शुन्यावरच माघारी

6.34 PM : फटकेबाजी करणारा संजू सॅमसन बाद

-  152 धावांच्या आव्हानाचा आश्वासक पाठलाग करत असलेल्या राजस्थानला दहाव्या षटकात दुसरा धक्का बसला आहे. सुरेख फटकेबाजी करणाऱ्या संजू सॅमसनला सिद्धांत कौलने माधारी धाडले. 

6.20 PM : राजस्थानच्या 50 धावा पूर्ण 

-   हैदराबादने दिलेल्या 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने 7 षटकांमध्ये 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. 
6.07 PM : संजू सॅमसनची फटकेबाजी

- बेसिल थम्पीने टाकलेल्या चौथ्या षटकात संजू सॅमसनने एक षटकार आणि दोन चौकारांसह वसूल केल्या 17 धावा

5.57 PM : राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का, राहुल त्रिपाठी त्रिफळाचीत 

- 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानला सुरुवातीलाच धक्का बसला आहे. संदीप शर्माने राहुल त्रिपाठीचा तिफळा उडवत हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. 

जयपूर - जोफ्रा आर्चर आणि कुष्णप्पा गौतम यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये आज सुरू असलेल्या पहिल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादला 151 धावांत रोखले. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला कर्णधार केन विल्यमसन आणि अॅलेक्स हेल्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या 92 धावांच्या दमदार भागीदारीनंतरही सनरायझर्स हैदराबादला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.  
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन 12 धावा काढू माघारी परतला. मात्र कर्णधार केन विल्यम्सन आणि अॅलेक्स हेल्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी 92 धावा जोडून संघाला सावरले. पण हेल्स (45) आणि विल्यम्सन (63) माघारी परतल्यानंतर हैदराबादची फलंदाजी कोलमडली. अखेर त्यांना निर्धारित 20 षटकांत 7 बाद 151 धावांपर्यंतच मजल मारता आली. 

5.33 PM : विल्यमसन-हेल्सच्या दमदार भागीदारीनंतर राजस्थानने हैदराबादला 151 धावांत रोखले

5.32 PM : आर्चरने टिपला सामन्यातील तिसरा बळी, रशिद खान बाद 

5.27 PM : मनीष पांडे बाद, हैदराबादला सहावा धक्का

- चांगल्या सुरुवातीनंतर डावाच्या अखेरीस हैदराबादच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली आहे. धडाकेबाज फलंदाज मनीष पांडेसुद्धा 16 धावा काढून बाद झाल्याने हैदराबादला सहावा धक्का बसला आहे. 

5.23 PM : हैदराबादला अजून एक धक्का, युसुफ पठाणही माघारी

- जोफ्रा आर्चरने शकीबपाठोपाठ युसूफ पठाणलाही माघारी धाडले. युसूफ पठाणला बनवता आल्या केवळ दोन धावा

5.19 PM : शकिब अल हसन बाद, हैदराबादची फलंदाजी अडखळली

- अठराव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरने उडवला शकीब अल हसनचा त्रिफळा, शकीब 6 धावा काढून माघारी परतला.

5.10 PM : 16 षटकांनंतर सनरायझर्स हैदराबादच्या 3 बाद 126 धावा

5.06 PM : हैदराबादची तिसरी विकेट, केन विल्यम्सन माघारी

- केन विल्यम्सन 43 चेंडूत 63 धावांची तडाखेबंद खेळी करून माघारी परतला. इश सोढीने काढली विकेट

4.59 PM : अॅलेक्स हेल्स बाद, हैदराबादला दुसरा धक्का 

- कृष्णाप्पा गौतमने अॅलेक्स हेल्सची विकेट काढत हैदराबादला दुसरा धक्का दिला. हेल्स 45 धावा काढून बाद झाला.

4.52 PM : 12.2 षटकात हैदराबादचे शतक फलकावर 

- केन विल्यमसन आणि  अॅलेक्स हेल्स यांनी 13 व्या षटकात हैदराबादला शतकी मजल मारून दिली आहे.

4.50 PM : केन विल्यमसनचे अर्धशतक पूर्ण 

4.44 PM : हैदराबादची सावध फलंदाजी, पहिल्या दहा षटकात 1 बाद 70 धावा

- सलामीवीर शिखर धवन झटपट बाद झाल्यानंतर सनसायझर्स हैदराबादने सावध पवित्रा घेतला आहे. कर्णधार केन विल्यम्सन आणि अॅलेक्स हेल्स यांच्या सावध खेळामुळे पहिल्या दहा षटकात हैदराबादला 1 बाद 70 धावांपर्यंतच मजल मारता आली आहे. 


4.31 PM :  हैदराबादच्या 50 धावा पूर्ण 

- 7.2 षटकांत हैदराबादने गाठला 50 धावांचा टप्पा, केन विल्यमसन आणि अॅलेक्स हेल्स मैदानात 

4.07 PM : सनरायझर्स हैदबादला पहिला धक्का, शिखर धवन बाद

- कृष्णाप्पा गौतमने तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर शिखर धवनचा त्रिफळा उडवत हैदराबादला पहिला धक्का दिला. धवन 12 धावांवर बाद झाला

3.32PM : सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकली, घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय

प्रतिस्पर्धी संघ




 

जयपूर - अजिंक्य रहाणेचा  राजस्थान रॉयल्स संघ आज  सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएलमधील आपली विजयी लय कायम राखण्यासाठी खेळणार आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवरील आव्हानाचा राजस्थानला अंदाज आहेच. दुसरीकडे सनरयजर्सने किंग्स पंजाबला नमवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे या लढतीत रास्थानसमोर कडवे आव्हान असेल

Web Title: RR vs SRH, IPL 2018 LIVE: Sunrisers Hyderabad won the toss & elected Bat first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.