पाकिस्तानमध्ये होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन,  श्रीलंका, वेस्ट इंडिजचे संघ येणार दौऱ्यावर 

गेल्या आठ वर्षांपासून दर्जेदार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून वंचित असलेल्या पाकिस्तानमध्ये आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेच्या संघांनी पाकिस्तानमध्ये  येण्याची तयारी दाखविली आहे. या संघांसोबत पाकिस्तान क्रिकेट संघ नोव्हेंबरमध्ये लाहोर येथे टी-२० खेळणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 10:55 PM2017-08-21T22:55:16+5:302017-08-21T22:59:01+5:30

whatsapp join usJoin us
The return to international cricket will be held in Pakistan, Sri Lanka, the West Indies will tour the team |  पाकिस्तानमध्ये होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन,  श्रीलंका, वेस्ट इंडिजचे संघ येणार दौऱ्यावर 

 पाकिस्तानमध्ये होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन,  श्रीलंका, वेस्ट इंडिजचे संघ येणार दौऱ्यावर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कराची, दि. 21 -  गेल्या आठ वर्षांपासून दर्जेदार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून वंचित असलेल्या पाकिस्तानमध्ये आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेच्या संघांनी पाकिस्तानमध्ये  येण्याची तयारी दाखविली आहे. या संघांसोबत पाकिस्तान क्रिकेट संघ नोव्हेंबरमध्ये लाहोर येथे टी-२० खेळणार आहे. 
 दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मंगळवारी श्रीलंका आणि वेस्ट इंडिज संघ सप्टेंबरनंतर दौ-यावर येणार असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. या दौºयात लाहोरमध्ये विश्व एकादशविरुद्ध टी-२० सामन्यांचेदेखील आयोजन होईल. पीसीबीने प्रसिद्धीस दिलेल्या वक्तव्यात विंडीज संघ नोव्हेंबरअखेरीस लाहोरमध्ये पाकविरुद्ध टी-२० सामने खेळेल. यामुळे पाकिस्तानमधील क्रिकेट शौकिनांना मायदेशात नऊ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आनंद उपभोगणे शक्य होणार आहे. २००९ मध्ये लंका क्रिकेट संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास कचरत आहेत. काही वर्षांपूर्वी झिम्बाब्वेच्या संघाला दौऱ्यावर बोलावून पाकिस्तानने आपल्या देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पुन्हा सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता. 
अधिक वाचा
प्रशिक्षकांनी मला सर्वांसमोर शिव्या हासडल्या, उमर अकमलचा खळबळजनक खुलासा
डोक्यावर बाऊन्सर आदळल्याने पाकिस्तानच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू  
  आता आयसीसी विश्व एकादश संघ पाकचा दौरा करतो किंवा नाही, यावर सामन्यांचे भवितव्य ठरणार आहे. पीसीबी चेअरमन नजम सेठी पत्रकार परिषदेत म्हणाले,‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाकमध्ये परत आणणे हाच माझा हेतू आहे. पुढील दोन-तीन वर्षांत आम्ही संपूर्ण विश्व एकादशची घोषणा करण्याइतपत सक्षम होऊ, अशी आशा आहे. यंदा मार्च महिन्यात लाहोरला पीएचएल फायनलचे आयोजन झाल्यापासून विश्व एकादश मालिकेवर चर्चा सुरू झाली.’ १५ सदस्यांच्या विश्व एकादश संघात सर्व देशांचे खेळाडू राहणार असल्ययाने एखाद्या राष्ट्राध्यक्षाला दिली जाणारी सुरक्षा खेळाडूंना पुरविण्यात येईल. या संघाचे कोच अ‍ॅण्डी फ्लॉवर असून संघात द.आफ्रिकेचा हाशिम अमला, फाफ डुप्लेसिस, मोर्ने मोर्केल आणि इम्रान ताहिर यांच्यासोबतच विंडीज, इंग्लंड आणि न्यूझीलंडचे खेळाडू असतील. बीसीसीआयने मात्र एकाही भारतीय खेळाडूला विश्व एकादशमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिलेली  नाही, असे सेठी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. सद्यस्थितीत कुठलाही आंतरराष्ट्रीय संघ लाहोरबाहेर सामना खेळण्यास तयार नाही, अशी कबुली देत सेठी पुढे म्हणाले, ‘श्रीलंकेची मनधरणी केल्यानंतर त्यांनी होकार कळविला आहे. सुरक्षेवर लंका सरकार समाधानी झाले तर लंका संघ 
ऑक्टोबरमध्ये येथे टी-२० सामन्यांसाठी येईल. पुढील वर्षी कराचीत पाकिस्तान सुपर लीगच्या काही सामन्यांचे आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यानंतरच आंतरराष्ट्रीय संघांना लाहोरबाहेर खेळण्याची विनंती करणार आहोत.’

Web Title: The return to international cricket will be held in Pakistan, Sri Lanka, the West Indies will tour the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.