ठळक मुद्देकोहली आणि डी' व्हिलियर्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयाचा पाया रचला.

कोहलीने भांगडा करत केला विजयाचा आनंद साजरा... पाहा हा व्हीडीओ


कोहली आणि डी' व्हिलियर्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बँगलोरचा दिल्लीवर विजय

नवी दिल्ली : जगातील सर्वोत्तम दोन फलंदाज विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या आकर्षक अर्धशतकी खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आज येथे दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवताना ५ गडी राखून विजय मिळवताना आयपीएलच्या प्लेआॅफमध्ये पोहोचण्याच्या धूसर आशा कायम ठेवल्या.
कोहलीने घरच्या फिरोजशाह कोटला मैदानावर ४० चेंडूंत ७० धावा केल्या. त्यात सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. डिव्हिलियर्सने ३७ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७२ धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ११८ धावांची भागीदारी केली. बँगलोरने १९ व्या षटकात ५ बाद १८७ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिल्लीने प्रथम फलंदाजी करीत ४ बाद १८१ धावा केल्या. त्यांच्याकडून ऋषभ पंतने ३४ चेंडूंत ६१ आणि कर्णधार श्रेयस अय्यरने ३५ चेंडूंत ३२ धावा केल्या. या दोघांनी ६२ चेंडूंत ९३ धावांची भागीदारी करीत संघाला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरले. १७ वर्षीय अभिषेकने १९ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४६ धावा केल्या आणि विजय शंकर याच्या साथीने नाबाद ६१ धावांची भागीदारी केली. विजय शंकरने १९ चेंडूंत नाबाद २० धावा केल्या.
दिल्लीचा संघ प्लेआॅफ शर्यतीतून आधीच बाद झालेला आहे. त्यांचा हा
१२ सामन्यांतील नववा पराभव ठरला. बँगलोरचा ११ व्या सामन्यातील हा चौथा विजय आहे. आता त्यांचे आठ गुण झाले असून त्यांची अद्यापही प्लेआॅफमध्ये पोहोचण्याची शक्यता बाकी आहे. बँगलोरचा दिल्लीवर २०१६ पासून हा सलग पाचवा विजय आहे.
दिल्लीप्रमाणेच बँगलोरनेदेखील त्यांचे दोन्ही सलामीवीर तिसºया षटकातच गमावले होते. नेपाळचा पहिला आयपीएल क्रिकेटर बनलेल्या लेगस्पिनर संदीप लेमिचाने याने दिल्लीकडून सुरुवात करीत आपला ठसा उमटवला. त्याने त्याच्या चार षटकांत पार्थिव पटेल (६) याच्या रुपाने त्याचा पहिला टी-२० मधील बळी घेतला. त्याआधी ट्रेंट बोल्टने मोईन अली (१) याला बाद केले. 

11.28 PM :  बँगलोरचा दिल्लीवर पाच विकेट्स राखून विजय

11.24 PM : बँगलोरला विजयासाठी 12 चेंडूंत 10 धावांची गरज

11.22 PM :  बँगलोरला पाचवा धक्का; सर्फराझ खान बाद

- दिल्लीच्या हर्षल पटेलने सर्फराझ खानला बाद करत बँगलोरला पाचवा धक्का दिला.

11.15 PM : बँगलोरला विजयासाठी 18 चेंडूंत 24 धावांची गरज

11.10 PM :  बँगलोरला चौथा धक्का; मनदीप सिंग बाद

- ट्रेंट बोल्टने मनदीप सिंगला बाद करत बँगलोरला चौथा धक्का दिला. बँगलोरला विजयासाठी 23 चेंडूंत 29 धावांची गरज.

11.09 PM :  बँगलोरला विजयासाठी 24 चेंडूंत 29 धावांची गरज

11.04 PM :  बँगलोर  15 षटकांत 3 बाद 147

रिषभ पंतच्या कमेंटवर कोहलीने काय केलं... पाहा हा व्हीडीओ


10.55 PM : विराट कोहली OUT; बँगलोरला मोठा धक्का

- दिल्लीचा फिरकीपटू अमित मिश्राने कोहलीला बाद करत बँगलोरला मोठा धक्का दिला. कोहलीने 40 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 70 धावा केल्या.

10.52 PM : डी' व्हिलियर्सचे षटकारासह अर्धशतक

- डी' व्हिलियर्सने षटकारासह आपले अर्धशतक 28 चेंडूंत साजरे केले.

10.55 PM : कोहली आणि डी' व्हिलियर्स यांची शतकी भागीदारी

- विराट कोहली आणि एबी डी' व्हिलियर्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत विजयाच्या दिशेने कूच केली.

विराट कोहलीने अर्धशतकाचा आनंद कसा साजरा केला ते या व्हीडीओमध्ये पाहा... 

10.30 PM : विराट कोहलीचे 26 चेंडूंत अर्धशतक

- विराटने सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 26 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.

10.26 PM : बँगलोर आठ षटकांत 2 बाद 76

10.14  PM : बँगलोर पाच षटकांत 2 बाद 45

10.02 PM :  बँगलोरला दुसरा धक्का; पार्थिव पटेल बाद

- नेपाळचा युवा फिरकीपटू संदीप लामिचानेने पार्थिव पटेलला बाद करत बँगलोरला दुसरा धक्का दिला. संदीपचा पहिल्या सामन्यातील पार्थिव हा पहिला बळी होता.

21.55 PM : बँगलोरला पहिला धक्का; मोईन अली बाद

- ट्रेंट बोल्टने मोईन अलीला बाद करत बँगलोरला पहिला धक्का दिला. अलीला एकच धाव करता आली.

दिल्लीची युवागिरी; बँगलोरविरुद्ध फटकावल्या 181 धावा

नवी दिल्ली : फिरोजशाह कोटला मैदानात शनिवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सची युवागिरी पाहायला मिळाली. रिषभ पंत आणि पदार्पण करणारा अभिषेक शर्मा यांच्या धडाकेबाज खेळींमुळे दिल्लीला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध फलंदाजी करताना 181 धावा फटकावत्या आल्या. पंतने 34 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 61 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. अभिषेकनेही आक्रमक फलंदाजी करत फक्त 19 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 46 धावांची झंझावाती खेळी साकारली.

9.33 PM : दिल्लीचे बँगलोरपुढे 182 धावांचे आव्हान

9.20 PM : दिल्लीच्या अभिषेक शर्माच्या 14 चेंडूंत 34 धावा

9.07 PM : दिल्लीला मोठा धक्का; कर्णधार श्रेयस अय्यर बाद

- बँगलोरचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला. श्रेयसने तीन चौकारांच्या जोरावर 32 धावा केल्या.

रिषभ पंतने अर्धशतकाचा आनंद कसा साजरा केला... पाहा हा व्हीडीओ 

8.58 PM : रिषभ पंत OUT; दिल्लीला मोठा धक्का

- बँगलोरचा फिरकीपटू मोईन अलीने पंतला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला. पंतने 34 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 61 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

8.52 PM :  रिषभ पंतने चौकारासह 27 चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक

- रीषभ पंतने 27 चेंडूंत प्रत्येकी चार चौकार आणि षटकारांसह अर्धशतक साजरे केले. या हंगामात रिषभने पाचवेळा पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

8.45 PM :  दिल्ली दहा षटकांत 2 बाद 78

8.23 PM : दिल्ली पाच षटकांत 2 बाद 39

8.12 PM : जेसन रॉय OUT; दिल्लीला दुसरा धक्का

युजवेंद्र चहलने सलामीवीर जेसन रॉयला त्रिफळाचीत केेले आणि दिल्लीला दुसरा धक्का दिला.

8.02 PM : पृथ्वी शॉ बाद; दिल्लीला पहिला धक्का

- पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर युजवेंद्र चहलने पृथ्वी शॉ याला बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला.

7.45 PM : विराट कोहली दिल्लीविरुद्धच्या सामन्यात खेळणार

तब्येत बिघडल्याने विराट सरावासाठीही उपस्थित नव्हता. त्यामुळे विराटऐवजी आता ए.बी डिव्हीलिअर्सला कॅप्टन्सी सांभाळावी लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. पण अखेर कोहलीने या सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

7.30 PM : बंगळुरुने नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी पाचारण केले 

 

बंगळुरुसाठी विजय अत्यावश्यक; आज दिल्लीशी दोन हात करणार

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला गुणतालिकेत तळाला असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यामध्ये शनिवारी सामना रंगणार आहे. दिल्लीचे या स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. पण या सामन्यात जर बँगलोरचा संघ पराभूत झाला तर त्यांचे आव्हानही संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणे बँगलोरसाठी अत्यावश्यक असेल.

 

दोन्ही संघ  


Web Title: RCBvDD, IPL 2018 LIVE: Virat Kohli will be playing against Delhi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.