RCB vs KKR, IPL 2018 : कोलकाताची विजयी सलामी; आरसीबी पराभूत

आक्रमक सलामीवीर सुनिल नरेन (५०) आणि कर्णधार दिनेश कार्तिक (३५*) यांच्या जोरावर कोलकातान नाइट रायडर्सने यंदाच्या आयपीएल सत्रात विजयी सलामी देताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ४ बळींनी पराभव केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:47 AM2018-04-09T01:47:21+5:302018-04-09T11:43:55+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs KKR, IPL 2018: Kolkata Knight Riders; RCB defeats | RCB vs KKR, IPL 2018 : कोलकाताची विजयी सलामी; आरसीबी पराभूत

RCB vs KKR, IPL 2018 : कोलकाताची विजयी सलामी; आरसीबी पराभूत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : आक्रमक सलामीवीर सुनिल नरेन (५०) आणि कर्णधार दिनेश कार्तिक (३५*) यांच्या जोरावर कोलकातानं नाइट रायडर्सने यंदाच्या आयपीएल सत्रात विजयी सलामी देताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ४ बळींनी पराभव केला. आरसीबीने दिलेले १७७ धावांचे आव्हान कोलकाताने १८.५ षटकात ६ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.
इडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीला मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर सुनिलने कोलकाताला आक्रमक सुरुवात करुन दिली. ख्रिस लिन (५) स्वस्तात परतल्यानंतर सुनिलने केवळ १९ चेंडूत ४ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करत ५० धावांची वेगवान खेळी केली. उमेश यादवने त्याला त्रिफळाचीत करुन आरसीबीची धुलाई रोखली. यानंतर ठराविक अंतराने आरसीबीने बळी मिळवत सामना समान स्थितीत आणला. यादरम्यान युवा नितिश राणाने २५ चेंडूत ३४ धावा, तर कर्णधार कार्तिकने अखेरपर्यंत टिकून राहत २९ धावांत नाबाद ३५ धावा काढून संघाला विजयी केले. ख्रिस वोक्सने (३/३६) नियंत्रित मारा करत आरसीबीच्या विजयाच्या आशा ठेवल्या होत्या.
तत्पूर्वी, धडाकेबाज सलामीवीर ब्रेंडन मॅक्क्युलम (४३) आणि विध्वंसक एबी डिव्हिलियर्स (४४) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने २० षटकात ७ बाद १७६ धावांची आव्हानात्मक मजल मारली. मधली फळी कोलमडल्यानंतर मनदीप सिंगच्या फटकेबाजीमुळे आरसीबीने चांगली धावसंख्या गाठली. क्विंटन डीकॉक (४) झटपट परतल्यानंतर मॅक्क्युलमने आक्रमक पवित्रा घेतला. मॅक्क्युलम २७ चेंडूत ४३ धावा करुन परतल्यानंतर कोहलीने ३३ चेंडूत ३१ धावा केल्या. यामुळे आरसीबीच्या धावगतीला खीळ बसली. डिव्हिलियर्स (२३ चेंडूत ४४ धावा) व मनदीप सिंगमुळे (१८ चेंडूत ३७) आरसीबीने १७६ धावा उभारल्या.

Web Title: RCB vs KKR, IPL 2018: Kolkata Knight Riders; RCB defeats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.