आफ्रिकेवर विजयाचा मोका साधला

मेलबर्नमध्ये रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाच्या समर्थकांनी चांगलीच गर्दी केली होती. संपूर्ण स्टेडियम भारतीय तिरंग्याने रंगून गेले होते.

शतकवीर शिखर धवनला सामनावीर हा पुरस्कार मिळाला.

भारतातर्फे आर. अश्विनच्या फिरकीने आफ्रिकन फलंदाजांची भंबेरी उडवली. अश्विनने आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना बाद केले.

एबी डिव्हिलियर्स आणि फा डू प्लेसिस या दोघांनी आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. प्लेसिस अर्धशतक झळकावून माघारी परतला. तर डिव्हिलियर्स धावबाद झाला. यानंतर एकही फलंदाज भारताच्या भेदक मा-यासमोर तग धरु शकला नाही व आफ्रिकेचा डाव १७७ धावांवरच आटोपला.

भारताचे ३०७ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली. हाशीम आमला व क्विंटन डी कॉक ही सलामीची जोडी ४० धावांमध्येच तंबूत परतली.

महेंद्रसिंह धोनी कर्णधार म्हणून यशस्वी ठरत असला तरी या सामन्यातही धोनीला मोठी खेळी करण्यात अपयश आले. सुरेश रैना जडेजाही या सामन्यात अपयशी ठरले.

पाकविरोधात भोपळा न फोडताच तंबूत परतणा-या अजिंक्य रहाणे आफ्रिकेविरोधात तडाखेबाज ७९ धावांची खेळी करत भारताला मजबूत स्थितीत आणले.

शिखर धवनने १३७ धावांची खेळी केली. शिखरचे वन डेतील हे सातवे शतक असून लागोपाठ दुस-या सामन्यात शिखरने चांगली फलंदाजी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा शून्य धावांवर असताना धावबाद झाला. मात्र त्यानंतर विराट कोहली व शिखर धवनने भारताचा डाव सावरला.

वर्ल्डकपमध्ये रविवारी भारताने दक्षिण आफ्रिकेवर १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागात भारताने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आफ्रिकेवर विजय मिळवला. या सामन्याचा घेतलेला हा आढावा...