वर्ल्डकप २०१५ मधील विक्रम

फायनलमधील पंच कुमार धर्मसेना असे पहिले पंच आहेत ज्यांनी वर्ल्डकप फायनलमध्ये पंच व खेळाडू म्हणून सहभाग घेतला आहे. १९९६ मध्ये लाहौर येथे पार पडलेल्या वर्ल्डकप फायनलमध्ये धर्मसेना यांनी स्टीव वॉची विकेट घेतली होती. १९९६ चा वर्ल्डकप श्रीलंकेने जिंकला होता.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बांग्लादेशने इंग्लंडचा पराभव करत बाद फेरीत धडक दिली. इंग्लंडला यंदा प्राथमिक फेरीतच वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळावा लागला.

वर्ल्डकपपूर्वी न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया दौ-यात सपाटून मार खाणा-या टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये सलग सात सामने जिंकून सेमी फायनलमध्ये धडक दिली. गतविजेत्या भारताचा विजयी रथ ऑस्ट्रेलियाने रोखला.

ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर ब्रँड हॅडिन वर्ल्डकपमधील यशस्वी विकेट किपर ठरला. त्याने यष्टीमागे १६ झेल टिपून ऑस्ट्रेलियाच्या विजयांमध्ये मोलाचे योगदान दिले.

न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्यूलमचा वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक स्टाईक रेट होता. त्याने ९ डावांमध्ये १८८ च्या स्ट्राईक रेटने ३२८ धावा केल्या.

न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ३३ धावांमध्ये ७ विकेट घेत वर्ल्डकपमध्ये विक्रम रचला.

श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकाराने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये लागोपाठ चार शतकं ठोकून विक्रम रचला. संगकाराने ७ सामन्यात १०८ च्या सरासरीने ५४१ धावा केल्या.

न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिल वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक ५४७ धावा केल्या. वर्ल्डकपमध्ये वैयक्तिक धावांचा विक्रमही त्याचाच नावावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध गुप्टिलने नाबाद २३७ धावांची खेळी केली होती. वर्ल्डकपमध्ये ५०० धावा करणारा तो न्यूझीलंडचा पहिला फलंदाज.

ऑस्ट्रेलियाचा डावखूरा गोलंदाज मिशेल स्टार्क वर्ल्डकप २०१५ मधील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला. त्याने ८ सामन्यांमध्ये २२४ धावा धेत २२ विकेट घेतल्या.

वर्ल्डकप २०१५ चे जेतेपद पटकावत ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच पैकी चार वर्ल्डकप ऑस्ट्रेलियानेच जिंकले आहेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध ४१७ धावांचा डोंगर उभा करुन नवा विक्रम रचला. २०१५ वर्ल्डकपचे वैशिष्ट्य ठरलेल्या घडामोडी काय आहेत ते बघूया