निवृत्तीबाबत युवराजसिंगचा मोठा खुलासा, सांगितली 'मन की बात'

युवाराज सिंगने निवृत्तीबद्दलचे संकेत दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 05:53 PM2018-02-28T17:53:02+5:302018-02-28T17:53:02+5:30

whatsapp join usJoin us
yuvraj singh reveals his retirement plans | निवृत्तीबाबत युवराजसिंगचा मोठा खुलासा, सांगितली 'मन की बात'

निवृत्तीबाबत युवराजसिंगचा मोठा खुलासा, सांगितली 'मन की बात'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - फिटनेस आणि खराब फॉर्ममुळं संघाबाहेर असेलेल्या युवाराज सिंगने निवृत्तीबद्दलचे संकेत दिले आहे. 2019मध्ये होणाऱ्या विश्वचषकच्या संघात स्थान मिळण्यासाठी सध्या युवराज कठोर प्रयत्न करत आहे. युवराजने जुलै 2017मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. भारतीय संघात संधी साठी आयपीएल 2018 मध्ये युवराजला चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहेत. अशामध्येच युवराजने निवृत्तीबाबत खुलासा केला आहे. 

मनाकोमध्ये लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्सदरम्यान पीटीआयशी बोलताना युवराजने 2019 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याचा खुलासा केला आहे.  तो म्हणाला की, एप्रिलमध्ये सुरु होणाऱ्या आयपीएल सामन्यावर सध्या माझे सर्व लक्ष आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या बळावर भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न असेल. 2019 पर्यंत क्रिकेट खेळण्याचा माझा विचार आहे. त्यानंतर निवृत्तीचा विचार करेल. 

खराब कामगिरीसोबतच फिटनेसचेही युवराज पुढे आव्हान आहे. पण संघात पुनरागमन करण्यासाठी त्यानं आपलं सर्व जोर वारला आहे. त्यामुळं पुढील काही दिवसांपूर्वी त्यानं यो-यो टेस्ट पास केली आहे. सध्या सुरेश रैनानं संघात संधी मिळवली आहे. त्यामुळं युवराजला ही संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये युवराजनेही चांगले प्रदर्शन केले आहे. युवराजने गेल्या 10 टी-20 सामन्यात 96 च्या सरासरीनं 217 धावा ठोकल्या आहेत. 

Web Title: yuvraj singh reveals his retirement plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.