'सिक्सर किंग' युवराज सिंग निवृत्तीच्या तयारीत, BCCI समोर ठेवली ही अट!

भारतीय संघातील स्फोटक फलंदाज युवराज सिंग निवृत्तीच्या विचारात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 05:21 PM2019-05-19T17:21:32+5:302019-05-19T17:24:05+5:30

whatsapp join usJoin us
Yuvraj Singh mulls retirement, may seek BCCI permission to compete in private T20 leagues | 'सिक्सर किंग' युवराज सिंग निवृत्तीच्या तयारीत, BCCI समोर ठेवली ही अट!

'सिक्सर किंग' युवराज सिंग निवृत्तीच्या तयारीत, BCCI समोर ठेवली ही अट!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतीय संघातील स्फोटक फलंदाज युवराज सिंग निवृत्तीच्या विचारात आहे. गेली दोन वर्ष युवराज भारताकडून एकही वन डे किंवा ट्वेंटी -20 सामना खेळलेला नाही. भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळेल याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारण्याचे ठरवले आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मान्यतेने होणाऱ्या परदेशातील ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अशी अट त्याने ठेवली आहे.

बीसीसीआयकडून ही परवानगी मिळाल्यास निवृत्ती घेणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. '' आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून युवराज निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. त्यासंदर्भात तो बीसीसीआयशी चर्चाही करणार आहे. पण, तत्पूर्वी GT20 ( कॅनडा), Euro T20 Slam (आयर्लंड) आणि हॉलंड येथे होणाऱ्या ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याच्या परवानगीवर त्याला बीसीसीआयच्या उत्तराची अपेक्षा आहे,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी Cricket Countryला सांगितले.  

भारताचा माजी गोलंजाज इरफान पठाणला कॅरेबियन प्रीमिअऱ लीगच्या लिलावात खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले आहे, परंतु त्याने बीसीसीआयकडून परवानगी घेतलेली नाही. ''इरफान अजूनही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. त्यामुळे त्याने कॅरेबियन लीगमधून माघार घ्याव, असे त्याला सांगण्यात आले आहे. युवराजलाही तिच चिंता सतावत आहे. त्यामुळे आम्हाला नियम पाहावे लागतील. त्यामुळे युवीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी बीसीसीआयकडे त्याची नोंद अॅक्टीव्ह ट्वेंटी-20 खेळाडू म्हणून आहे,'' असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.


युवराज यंदा मुंबई इंडियन्सकडून इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळला, परंतु तेथेही त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. युवराजने 30 जून 2017 मध्ये भारतासाठी अखेरचा वन डे सामना, तर 1 फेब्रुवारी 2017 मध्ये ट्वेंटी-20 सामना खेळला होता. 304 वन डे सामन्यात त्याने 8701 धावा केल्या आहेत आणि त्यात 14 शतकं व 52 अर्धशतकांचा समावेश आहे. 58 ट्वेंटी-20 सामन्यांत त्याने 1177 धावा केल्या आहेत. वन डे आणि ट्वेंटी-20 मध्ये त्याने अनुक्रमे 111 व 28 विकेट्स घेतल्या आहेत. 

Web Title: Yuvraj Singh mulls retirement, may seek BCCI permission to compete in private T20 leagues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.