धो.. धो.. धोनी

तडाखेबंद खेळीच्या जोरावर धोनीने आयपीएलमध्ये एकाचवेळी अनेक विक्रम नोंदविले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 03:19 AM2019-04-23T03:19:23+5:302019-04-23T03:20:11+5:30

whatsapp join usJoin us
Wash .. wash .. Dhoni | धो.. धो.. धोनी

धो.. धो.. धोनी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने रविवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध झालेल्या रोमांचक सामन्यात प्रतिस्पर्धी कर्णधार विराट कोहलीला अखेरच्या चेंडूपर्यंत तणावात ठेवले होते. धोनीने ६ चेंडूंत २६ धावांचे अंतर १ चेंडू २ धावांवर आणल्याने आरसीबीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. हातातोंडाशी असलेला घास धोनी हिसकावणार, असेच सर्वांना वाटत होते. मात्र, उमेश यादवला सुबुद्धी सुचली आणि त्याने हळुवार चेंडू टाकला.

यष्टिरक्षक पार्थिव पटेलने पुढचे काम चोख बजावले. त्याने शार्दुल ठाकूरला धावबाद करून आरसीबीला अवघ्या एका धावेने विजय मिळवून दिला. महेंद्रसिंग धोनीने १७५च्या तुफानी स्ट्राईक रेटने ४८ चेंडूंत ७ षटकार व ५ चौकारांसह नाबाद ८४ धावांचा तडाखा दिला. या तडाखेबंद खेळीच्या जोरावर धोनीने आयपीएलमध्ये एकाचवेळी अनेक विक्रम नोंदविले.

आयपीएलमधील धोनीची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी त्याने २०१८मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध मोहालीत नाबाद ७९ धावा केल्या होत्या. २०१९मध्येच चेन्नईत झालेल्या सामन्यात धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद ७५ धावा फटकावल्या होत्या.
आयपीएलमध्ये २०० षटकार खेचणारा धोनी पहिला भारतीय खेळाडू ठरला. या क्रमवारीत ख्रिस गेल (३२३) आणि एबी डिव्हिलियर्स (२०४) आघाडीवर आहेत. धोनीच्या नावावर २०३ षटकार आहेत.
आयपीएलमध्ये ४००० धावांचा पल्ला पार करणारा धोनी पहिला कर्णधार ठरला आहे.
चेन्नई सुपरकिंग्जकडून सर्वाधिक १६८ षटकारांचा विक्रमही धोनीने आपल्या नावावर केला. त्याने सुरेश रैनाच्या १६७ षटकारांचा विक्रम मोडला.
धोनीला ‘मॅच फिनिशर’ का बोलतात, याची प्रचिती पुन्हा एकदा समोर आली आहे. २०व्या षटकात सर्वाधिक चारवेळा २०पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम धोनीने नोंदविला आहे. 
रोहित शर्माने तीन वेळा, तर युवराज सिंग, डेव्हिड मिल्लर व ख्रिस मॉरिस यांनी प्रत्येकी दोन वेळा पराक्रम केला आहे.

Web Title: Wash .. wash .. Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.