कोहलीचे 'देश सोडा' उत्तर भावनेच्या भरात, विश्वविजेत्या खेळाडूची पाठराखण 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने एका प्रश्नावर चाहत्याला चक्क देश सोडण्याचे उत्तर दिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 08:55 AM2018-11-13T08:55:48+5:302018-11-13T08:57:12+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli lost control while making 'leave India' comment, say Viswanathan Anand | कोहलीचे 'देश सोडा' उत्तर भावनेच्या भरात, विश्वविजेत्या खेळाडूची पाठराखण 

कोहलीचे 'देश सोडा' उत्तर भावनेच्या भरात, विश्वविजेत्या खेळाडूची पाठराखण 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देविराट कोहलीने चाहत्याला देश सोडण्यास सांगितले होतेनेटीझन्स आणि बीसीसीआयने त्याच्यावर टीका केलीमात्र, मोहम्मद कैफने त्याची पाठराखण केली होती

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने एका प्रश्नावर चाहत्याला चक्क देश सोडण्याचे उत्तर दिले होते. त्याच्या या प्रतिक्रियेचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेण्यात आला. एरवी कोहलीचा उदोउदो करणारेही त्याच्या विरोधात बोलले. बीसीसीआयनेही कोहलीचे कान टोचले. त्याचे हे उत्तर म्हणजे मूर्खपणाच असे बीसीसीआयने म्हटले. मात्र, विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला कोहलीचे ते उत्तर भावनेच्या भरात आल्याचे वाटते. 

( Video : विराट कोहलीचा पारा चढला, चाहत्याला म्हणाला देश सोडून जा! )

तो म्हणाला,"त्या प्रश्नानंतर कोहलीला राग अनावर झाला. त्यामुळे त्याने भावनेच्या भरात जे उत्तर प्रथम मनात आले ते दिले. तो त्याचा स्वभाव आहे. खेळाडूच्या वृत्तीचाही विचार करायला हवा. कोहली असाच आहे. त्यामुळे व्यक्तीनुसार स्वभाव बदलत असतात." 

(भारतीयांमुळे तुला पगार मिळतो, बीसीसीआयने कोहलीचे कान टोचले)

गत आठवड्यात कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओत कोहली मोबाईलवर काही तरी वाचताना दिसत होता. भारतीय फलंदाजांच्या तुलनेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा खेळ अधिक आनंददायी असतो, असे एका चाहत्याने लिहिले. त्यावर कोहली म्हणाला,''तुम्ही भारतात राहू नका. तुम्हाला दुसरे देश आवडतात, मग तुम्ही आमच्या देशात का राहता?'' त्यानंतर कोहलीवर टीका झाली. 

दिलगिरी सोडा, विराट कोहलीने 'त्या' विधानावर दिली ही प्रतिक्रिया...)

"कोहलीने जेव्हा भावनेच्या भरात उत्तर दिले तोच क्षण टिपण्यात आले. तो खूप भावनीक झाला होता आणि म्हणून त्याला राग अनावर झाला. त्याच्यावर भरपूर टीका झाली आणि हा विषय इथेच संपायला हवा," असे आनंद म्हणाला. 
 

Web Title: Virat Kohli lost control while making 'leave India' comment, say Viswanathan Anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.