केकेआरच्या कर्णधारपदासाठी दोन यष्टीरक्षकांमध्ये चुरस

यापूर्वी बराच काळ केकेआरचे नेतृत्व गौतम गंभीरकडे सोपवण्यात आले होते. पण सध्याच्या घडीला त्याच्याकडून चांगली कामगिरी झालेली नाही. त्यामुळे केकेआर सध्या नव्या कर्णधाराच्या शोधात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 04:04 PM2018-03-02T16:04:47+5:302018-03-02T16:04:47+5:30

whatsapp join usJoin us
Two wicketkeepers for KKR captaincy | केकेआरच्या कर्णधारपदासाठी दोन यष्टीरक्षकांमध्ये चुरस

केकेआरच्या कर्णधारपदासाठी दोन यष्टीरक्षकांमध्ये चुरस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देकेकेआरपुढे यावेळी बरेच पर्याय दिसत आहेत. यामध्ये दोन यष्टीरक्षकाचा समावेश आहे, तर दोन परदेशी खेळाडूही या शर्यतीत आहेत.

आयपीएल काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना कोलकाता नाईट रायडर्सला अजूनही आपल्या संघाच्या नेतृत्वाची धुरा कोण वाहणार हे ठरवता आलेले नाही. यापूर्वी बराच काळ केकेआरचे नेतृत्व गौतम गंभीरकडे सोपवण्यात आले होते. पण सध्याच्या घडीला त्याच्याकडून चांगली कामगिरी झालेली नाही. त्यामुळे केकेआर सध्या नव्या कर्णधाराच्या शोधात आहे.
केकेआरपुढे यावेळी बरेच पर्याय दिसत आहेत. यामध्ये दोन यष्टीरक्षकाचा समावेश आहे, तर दोन परदेशी खेळाडूही या शर्यतीत आहेत. पण आयपीएलमध्ये फक्त चारच परदेशी खेळवण्याची मुभा आहे. त्यामुळे जर कर्णधार परदेशातला असेल तर संघनिवडीसाठी फार कमी पर्याय शिल्लक राहतात.
केकेआरपुढे सध्या भारताच्या दोन खेळाडूंचा पर्याय आहे आणि हे दोन्ही यष्टीरक्षक आहेत. त्यामध्ये  पहिला पर्याय हा रॉबिन उथप्पाचा असेल. पण त्याला कडवी झुंज असेल ती दिनेश कार्तिकची. 
उथप्पाने गेल्या मोसमात केकेआरकडून दमदार कामगिरी केली होती.  उथप्पा 2014 सालापासून केकेआरच्या संघातील एक अविभाज्य भाग आहे. गंभीरबरोबर सलामीला येऊन त्याने चांगली कामिगरी केली आहे. केकेआरने दुसऱ्यांदा जेव्हा जेतेपद पटकावले होते, तेव्हा  16 सामन्यांतील विजयांमध्ये उथप्पाच्या 660 धावांचा समावेश होता. उथप्पाकडे आतापर्यंतच्या 149 आयपीएल सामन्यांचा अनुभव आहे, त्यामध्ये त्याने 22 अर्धशतकांच्या जोरावर 3735 धावा केल्या आहेत.गेल्या मोसमातील 14 सामन्यांमध्ये त्याने 388 धावा केल्या होत्या. यापूर्वीच्या दोन मोसमांमध्येही (2015 आणि 2016) उथप्पाने अनुक्रमे 364 आणि 394 धावा केल्या होत्या. त्यामुळे केकेआरच्या कर्णधारपदासाठी उथप्पाची दावेदारी प्रबळ समजली जात आहे.
कार्तिककडे उथप्पापेक्षा तीन आयपीएल सामन्यांचा (152) जास्त अनुभव आहे. गुजरत लायन्सकडून खेळताना कार्तिकने चमकदार कामगिरी केली होती. गेल्या दहा वर्षांमध्ये कार्तिकने 2903 धावा केल्या आहेत, यामध्ये 14 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षणाची जबाबदारी चोख पार पाडताना कार्तिकने 88 झेल टिपले आहेत.
केकेआरला जर परदेशी कर्णधार करायचा असेल तर त्यांच्यापुढे सुनील नरिन आणि ख्रिस लिन असे दोन पर्याय उपलब्ध असतील. नरिन हा केकेआरसाठी फक्त एक महत्वाचा गोलंदाज राहिलेला नाही, तर गेल्या मोसमात त्याने धडाकेबाज सलामी दिली होती. त्यामुळे नरिन आता केकेआरचा एक अविभाज्य भाग झाला आहे. नरिन 2012 सालापासून केकेआरकडे आहे. आपल्या पहिल्या मोसमात नरिनने तब्बल 24 बळी मिळवले होते. गेल्या मोसमात त्याने 180.98 च्या सरासरीने 224 धावा फटकावल्या होत्या. पण क्षेत्ररक्षणामध्ये मात्र त्याला चांगली कामिगरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याला संघाचे कर्णधारपद मिळण्याची शक्यता थोडी धुसर आहे.
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस हा नेतृत्वासाठी योग्य पर्याय असल्याचे केकेआरच्या संघ व्यवस्थापनाला वाटत आहे. पण त्याची दुखापत हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न असेल. कारण आतापर्यंत दुखापतींमुळे त्याला गेल्या काही हंगामात पूर्ण आयपीएल स्पर्धा खेळता आलेली नाही. यावेळीही तो जायबंदी असल्याने तो सुरुवातीपासून लीगमध्ये खेळेल की नाही याबाबत शंक उपस्थित केली जात आहे. त्यामुळे केकेआरच्या कर्णधारपदासाठी उथप्पा आणि कार्तिक यांच्यामध्ये चुरस असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Two wicketkeepers for KKR captaincy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.