धोनी, धवन, केदारच्या फोटोवरुन चाहते सुसाट; हार्दिक, राहुलची खिल्ली

नेटिझन्सकडून हार्दिक पांड्या, के. एल. राहुल ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 09:25 AM2019-01-14T09:25:51+5:302019-01-14T09:33:19+5:30

whatsapp join usJoin us
twitter users trolls hardik pandya k l rahul after kedar jadhav shares photo with ms dhoni shikhar dhawan | धोनी, धवन, केदारच्या फोटोवरुन चाहते सुसाट; हार्दिक, राहुलची खिल्ली

धोनी, धवन, केदारच्या फोटोवरुन चाहते सुसाट; हार्दिक, राहुलची खिल्ली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई: कॉफी विथ करण कार्यक्रमातील विधानांमुळे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल अडचणीत आले आहेत. महिलांबद्दल केलेल्या अपमानजनक विधानांमुळे या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे करणसोबतच्या कॉफीमुळे हार्दिक आणि राहुलचं तोंड पोळल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. एकीकडे हार्दिक आणि राहुलला कॉफी महागात पडली असताना दुसरीकडे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, शिखर धवनसोबत चहा घेत असतानाचा फोटो केदार जाधवनं ट्विटरवर शेअर केला आहे.







केदार जाधवनं काल धोनी आणि धवन सोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला. यामध्ये हे तिन्ही क्रिकेटपटू चहाचा आनंद घेताना दिसत आहे. एक कप चहा सर्वकाही ठिक करतो, असं केदारनं या फोटोसोबत म्हटलं आहे. या फोटोचा संबंध अनेकांनी थेट हार्दिक आणि राहुलच्या 'कॉफी विथ करण'शी जोडला आहे. केदारनं धोनी आणि धवनसोबत चहा घेत हार्दिक आणि राहुलच्या 'कॉफी'वर निशाणा साधल्याच्या प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. 






जखमेवर मीठ चोळणं माहीत होतं. पण इथं तर केदार जाधव जखमेवर चहा ओततो आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ट्विटरवर अनेकांनी या फोटोबद्दल भाष्य करताना दिल्या. तर ट्रोल करावं, तर केदारसारखं, अशी प्रतिक्रियाही एकानं दिली आहे. तर बरं झालं तुम्ही कॉफी प्यायला नाहीत, असंदेखील एकानं म्हटलं आहे. एक कप चहानं सर्व काही ठिक होतं. पण एक कप कॉफीमुळे सर्व काही बिघडतं, असा टोलादेखील एका ट्विटर युजरनं लगावला आहे. चांगली मुलं कॉफीला नाहीच म्हणतात, अशीही प्रतिक्रियादेखील एकानं दिली आहे. 

Web Title: twitter users trolls hardik pandya k l rahul after kedar jadhav shares photo with ms dhoni shikhar dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.