T10 League: राजपूतचा पंजाबी लिजंट्स संघावर विजय

राजपूत संघाने प्रथम फलंदाजी करताना 117 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लिजंट्स संघाला 105 धावा करता आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 10:09 PM2018-11-28T22:09:34+5:302018-11-28T22:11:17+5:30

whatsapp join usJoin us
T10 League: Rajput's Victory over Punjabi Legends team | T10 League: राजपूतचा पंजाबी लिजंट्स संघावर विजय

T10 League: राजपूतचा पंजाबी लिजंट्स संघावर विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देराजपूत संघाने पंजाबी लिजंट्स संघावर 12 धावांनी विजय मिळवला.राजपूत संघाकडून कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने दमदार फलंदाजीचा नुमना पेश केला.राजपूत संघाकडून मुनाफ पटेल आणि टीमल मिल्सने प्रत्येकी दोन बळी मिळवले.

शारजा, टी-10 लीग : राजपूत संघाने पंजाबी लिजंट्स संघावर 12 धावांनी विजय मिळवला. राजपूत संघाने प्रथम फलंदाजी करताना 117 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लिजंट्स संघाला 105 धावा करता आल्या.


लिजंट्स संघाने नाणेफेक जिंकली आणि राजपूत संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. राजपूत संघाकडून कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने दमदार फलंदाजीचा नुमना पेश केला. ब्रेंडनने 15 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 28 धावा केल्या. लिजंट्स संघाकडून ख्रिस जॉर्डन आणि झहीर खान या दोघांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.


राजपूत संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना लिजंट्सचा सलामीवीर उमर अकमलने दमदार फलंदाजी केली. त्याने 19 चेंडूंत 2 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 34 धावा केल्या. अकमल बाद झाल्यावर फिलीप सॉल्टने संघाची बाजू लावून धरली. त्याने 17 चेंडूंत 3 चौकार आणि दोन षटाकारांच्या जोरावर नाबाद 34 धावा केल्या. पण तरीही लिजंट्स संघाला विजय मिळवता आला नाही. राजपूत संघाकडून मुनाफ पटेल आणि टीमल मिल्सने प्रत्येकी दोन बळी मिळवले.


Web Title: T10 League: Rajput's Victory over Punjabi Legends team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.