सामना अनिर्णीत ठरण्याच्या दिशेने, भारत ‘अ’ विरुद्ध दक्षिण आफ्रिका ‘अ’ लढत

भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांदरम्यान अलूर येथे सुरु असलेल्या दुसऱ्या चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामन्याच्या तिस-या दिवशी रविवारी पावसाने वर्चस्व गाजवले. रविवारी केवळ ३३ षटकांचा खेळ झाला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 05:04 AM2018-08-13T05:04:55+5:302018-08-13T05:05:09+5:30

whatsapp join usJoin us
South Africa 'A' fight against India 'A' | सामना अनिर्णीत ठरण्याच्या दिशेने, भारत ‘अ’ विरुद्ध दक्षिण आफ्रिका ‘अ’ लढत

सामना अनिर्णीत ठरण्याच्या दिशेने, भारत ‘अ’ विरुद्ध दक्षिण आफ्रिका ‘अ’ लढत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बेंगळुरू : भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांदरम्यान अलूर येथे सुरु असलेल्या दुसऱ्या चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामन्याच्या तिस-या दिवशी रविवारी पावसाने वर्चस्व गाजवले. रविवारी केवळ ३३ षटकांचा खेळ झाला. त्यात भारतीय गोलंदाजांनी चार बळी घेत पुनरागमन केले.
पावसामुळे तिसºया दिवशीचा खेळ निर्धारित वेळेत सुरू होऊ शकला नाही. उपाहारानंतर १२.१० वाजता खेळ प्रारंभ झाला. दक्षिण आफ्रिका संघाने ३ बाद २१९ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण खेळ थांबण्यापूर्वी त्यांनी ७५ धावांत ४ फलंदाज गमावले होते. खेळ थांबला त्यावेळी दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाची ७ बाद २९४ अशी स्थिती होती. पहिल्या डावातील कामगिरीच्या आधारावर दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघ अद्याप ५१ धावांनी पिछाडीवर आहे. या लढतीत केवळ एक दिवसाचा खेळ शिल्लक असून, सामना अनिर्णीत होण्याची शक्यता अधिक आहे.
शनिवारी नाबाद असलेला फलंदाज रुडी सेकेंड (४७) आणि रासी वेन डर डुसेन (२२) यांच्या दरम्यानची ७० धावांची भागीदारी अंकित राजपूतने (२-४२) संपुष्टात आणली. राजपूतने डुसेनला बाद केल्यानंतर सेकेंडलाही तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर जयंत यादवने (१-६५) ड्वेन प्रीटोरियसला (१०) आणि मोहम्मद सिराजने (२-५८) कर्णधार डेन पीटला (२२) बाद करीत भारताला पुनरागमन करून दिले.
पंचांनी तिसºया दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली त्यावेळी सेनुराम मुथुस्वामी (२३) खेळपट्टीवर होता. भारतीय संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक

ुँभारत ‘अ’ (पहिला डाव) : १०१ षटकात सर्वबाद ३४५ धावा.
दक्षिण आफ्रिका ‘अ’ (पहिला डाव) : ९२.३ षटकात ७ बाद २९४ धावा (झुबेर हामझा ९३, सॅरेल एर्वी ५८, रुडी सेकेंड ४७, सेनुरन मुथुसॅमी खेळत आहे २३; अंकित राजपूत १७-६-४२-२; मोहम्मद सिराज १८.३-३-५८-२; युझवेंद्र चहल २२-१-८४-२; जयंत यादव १४-२-६५-१; नवदीप सैनी २१-९-४१-०.)
 

Web Title: South Africa 'A' fight against India 'A'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.