स्मिथ, वॉर्नरवर वर्षभराची बंदी, चेंडू कुरतडल्याप्रकरणी जगभरातून टीकेचा भडिमार

चेंडू कुरतडल्याप्रकरणी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:06 AM2018-03-29T03:06:11+5:302018-03-29T03:06:11+5:30

whatsapp join usJoin us
Smith, Warner banned for a year, ball tampering worldwide | स्मिथ, वॉर्नरवर वर्षभराची बंदी, चेंडू कुरतडल्याप्रकरणी जगभरातून टीकेचा भडिमार

स्मिथ, वॉर्नरवर वर्षभराची बंदी, चेंडू कुरतडल्याप्रकरणी जगभरातून टीकेचा भडिमार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी/नवी दिल्ली : चेंडू कुरतडल्याप्रकरणी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची, तर चेंडू कुरतडणारा कॅमरून बेनक्रॉफ्ट याच्यावर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट आॅस्ट्रेलियाने हा निर्णय जाहीर केला. दुसरीकडे बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्यास या खेळाडूंवर बंदी घातली. आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी या वृत्तास दुजोरा दिला.
बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी यंदा आयपीएलमध्ये स्मिथ आणि वॉर्नर यांना खेळू न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात चेंडू कुरतडल्याची कबुली देताच संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले होते. आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे कृष्णकृत्य कॅमेऱ्यात कैद होताच त्यांना टाळाटाळ करणे कठीण गेले. स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर व बेनक्रॉफ्ट या तिघांवर कारवाई होणार हे नक्की होते, फक्त काय कारवाई होणार ते स्पष्ट नव्हते. बुधवारी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने कर्णधार व उपकर्णधाराला प्रत्येकी एक वर्षाची बंदी घातली. बेनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली.
आयपीएलच्या कर्णधारपदावरून स्मिथ व वॉर्नर दोघांची गच्छन्ती झाली असली तरी ते आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होते. कालच दक्षिण आफ्रिका दौºयावरून स्मिथ व वॉर्नर यांना मंगळवारी मायदेशी परत पाठवण्यात आले.
या प्रकरणी संपूर्ण चौकशी करण्यात येत असून सविस्तर कारवाईबाबत तीन दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचे क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी आॅस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डेरेन लेहमन यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून दक्षिण आफ्रिका दौºयात ते प्रशिक्षक म्हणून कायम राहतील, असे सीएने म्हटले होते.

स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमरून बेनक्रॉफ्ट हे क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या नियमावलीतील कलम २.३.५ नुसार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत.
या खेळाडूंच्या जागी आता मॅट रेनशॉ, ग्लेन मॅक्सवेल आणि जो बर्न्स आॅस्ट्रेलियाच्या संघाकडून खेळतील. टिम पेनची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मीडियावृत्तानुसार या तिन्ही खेळाडूंना शिक्षेविरुद्ध अपील करण्यासाठी एक आठवड्यांचा अवधी देण्यात आला.

लेहमन यांचा गुरुमंत्र पडला महागात
आॅस्ट्रेलियन क्रिकेटचा बट्ट्याबोळ
प्रशिक्षक डेरेन लेहमन यांना चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात क्लीन चिट मिळाली असली तरी कुठल्याही स्थितीत विजय मिळवा, ही मानसिकता संघाची बट्ट्याबोळ करणारी ठरली.
लेहमन यांनी २०१३ मध्ये प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांना आॅस्ट्रेलियन क्रिकेटचा संकटमोचक संबोधण्यात येत आहे. तथापि, आता संघात दूषित भावना भरविण्यासाठी दोषी मानले जात आहे. त्यांनी खेळाडूंमध्ये रुजविलेली मानसिकता या प्रसंगास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवला जात आहे.

वॉर्नरने नेतृत्व सोडले
डेव्हिड वॉर्नरने आयपीएलच्या सनराईजर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व सोडले आहे. चेंडू कुरतडल्याच्या घटनेमुळे वॉर्नरने हा निर्णय घेतला. संघाचा नवा कर्णधार लवकरच नियुक्त होईल, असे संघाचे सीईओ के. षन्मुगम यांनी सांगितले.

गमावलेली पत सुधारणे कठीण - हसी
चेंडू कुरतडल्याप्रकरणी आॅस्ट्रेलियाने प्रतिष्ठा गमावली आहे. खेळाडूंच्या या कृत्यामुळे देशाने जी पत गमावली त्याची भरपाई होणे कठीण असल्याचे मत माजी फलंदाज मायकेल हसी याने व्यक्त केले.
 

Web Title: Smith, Warner banned for a year, ball tampering worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.