सचिनला आऊट का नाही दिलं हे अजून समजत नाहीये - सईद अजमल

40 वर्षांच्या अजमलने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, आपल्या यशस्वी विवादास्पद कारर्किदीदरम्यान एक वेळ अजमल एकदिवसीय आणि टी-२0 आंतरराष्ट्रीय स्तरावर नंबर 1 चा गोलंदाज होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 04:02 PM2017-11-30T16:02:17+5:302017-11-30T16:03:45+5:30

whatsapp join usJoin us
Saeed ajmal still not understanding why sachin tendulkar was not given out | सचिनला आऊट का नाही दिलं हे अजून समजत नाहीये - सईद अजमल

सचिनला आऊट का नाही दिलं हे अजून समजत नाहीये - सईद अजमल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कराची:  5 वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन गेला पण पाकिस्तानचा माजी अव्वल फिरकी गोलंदाज सईद अजमलला 2011 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये सचिन तेंडुलकरला नाबाद का ठरवलं हे अजूनही समजत नाहीये. या सामन्यात अजमलने केलेली एलबीडब्ल्यूची मागणी फेटाळून लावत अंपायरने सचिनला नाबाद ठरवलं होतं. 40 वर्षांच्या अजमलने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

मोहालीच्या मैदानात पाकिस्तानविरूद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात सचिनने 85 धावा केल्या होत्या. नंतर अजमलनेच त्याला शाहिद आफ्रिदीकडे झेल देण्यास भाग पाडत त्याची विकेट घेतली होती. त्या मॅचमध्ये सचिन एलबीडब्ल्यू असल्याचा मला पूर्ण विश्वास होता, पण अंपायरने सचिनला नाबाद का ठरवलं हे मला अजूनही समजत नाहीये असं अजमल म्हणाला. 

यावेळी बोलताना अजमलने भारतीय फलंदाजांना गोलंदाजी करणं सोपं नव्हतं असं म्हटलं आहे. तेंडुलकर आणि कंपनीला गोलंदाजी करणं नेहमीच क्षमतेची परीक्षा घेण्यासारखं होतं असं अजमल म्हणाला. 

पाहा व्हिडीओ -


आपल्या यशस्वी विवादास्पद कारर्किदीदरम्यान एक वेळ अजमल एकदिवसीय आणि टी-२0 आंतरराष्ट्रीय स्तरावर नंबर १ चा गोलंदाज होता. कसोटी क्रिकेटमध्येसुद्धा त्याने सफलता प्राप्त केली होती. त्याने २0१२ मध्ये इंग्लड विरुद्ध ३ कसोटी सामन्यांत २४ बळी घेतले होते. परंतु, त्यानंतर त्याची गोलंदाजी शैली विवादास्पद असल्याचे जाहीर करून त्याच्यावर बंदी घालण्यात आली. त्याने आपल्या गोलंदाजी शैलीत बदल करून २0१५ मध्ये पुनरागमन केले. परंतु, त्याच्या गोलंदाजीमध्ये पूर्वीएवढी अचूकता व भेदकता नव्हती. पुन्हा गोलंदाजी करण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्याने बांगलादेश विरुद्ध २ वन डे आणि १ टी-२0 सामन्यात फक्त १ बळी घेतला होता. त्यानंतर त्याची कधीही राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली नव्हती.
अजमलने रावलपिंडी येथे वृत्तसंस्थेला सांगितले की, मी वर्तमान राष्ट्रीय टी-२0 स्पर्धेनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. माझी कारकीर्द समाधानकारक होती. मी जे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले होते ते पूर्ण झाले आहे. संघाच्या विजयात मी योगदान दिले आहे. अजमलने ३५ कसोटी सामन्यांत १७८, ११३ वन डे मध्ये १८४ आणि ६४ टी-२0 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८५ बळी घेतले आहेत. 

Web Title: Saeed ajmal still not understanding why sachin tendulkar was not given out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.