आजच्या दिवशी सचिनने शोएबला समजावला बाप असण्याचा अर्थ...

डावाची सुरुवात करताना सचिन चांगला रंगात आला होता. पण नेहमी धडाकेबाज फलंदाजी करणारा वीरेंद्र सेहवागची बॅट मात्र शांत होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 02:17 PM2018-03-01T14:17:53+5:302018-03-01T14:17:53+5:30

whatsapp join usJoin us
Sachin tendulkar smashesh shoaib akhtar | आजच्या दिवशी सचिनने शोएबला समजावला बाप असण्याचा अर्थ...

आजच्या दिवशी सचिनने शोएबला समजावला बाप असण्याचा अर्थ...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेटचा सामना म्हणजे युद्धंच आणि जर हा सामना विश्वचषकातला असेल तर ते ठरतं महायुद्ध. भारत या महायुद्धात कधीही पराभूत झालेला नाही. आणि बहुतेक वेळा या महायुद्धात भारताच्या विजयाचा सारथी ठरला होता तो सचिन तेंडुलकर. अशाच एका महायुद्धात सचिनने भारताच्या विजयाचे सारथ्य केले होते. हाच तो दिवस, 1 मार्च, पण साल मात्र 2003. दक्षिण आफ्रिकेत घडलेलं महायुद्ध.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. सईद अन्वरच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने केल्या होत्या 273 धावा. या आव्हानाचा पाठलाग करायला सचिन आणि वीरेंद्र सेहवाग, त्यांच्यापुढे आव्हान होते ते वसिम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर असा तोफखाना. पण या तोफखान्याला शांत केलं ते सचिनच्या बॅटनेच.
डावाची सुरुवात करताना सचिन चांगला रंगात आला होता. पण नेहमी धडाकेबाज फलंदाजी करणारा वीरेंद्र सेहवागची बॅट मात्र शांत होती. त्यावेळी अख्तर त्याला खिजवत होता. बाऊन्सर टाकून, या चेंडूंवर हुकचा फटका मार, असं तो सेहवागला हिणवत होता. अख्तरच्या एका चेंडूवर सेहवागने एकेरी धाव घेतली. तेव्हा पुन्हा एकदा अख्तर सेहवागला चिडवायला लागला. वीरुचा संयम सुटला आणि तो म्हणाला... आता जो बॅटींग करतोय ना, तो तुझा बाप आहे. त्याला बाऊन्सर टाक आणि बघ काय होतं ते. अख्तर थांबणारा नव्हताच. त्याने सचिनलाही तसाच बाऊन्सर टाकला. सचिनने त्या चेंडूवर अद् भूत असा षटकार लगावला. तेव्हा सेहवाग अख्तरला म्हणाला... बाप बाप होता हैं, बेटा बेटा होता हैं... अख्तरलाही ते कळून चुकले आणि त्यानंतर सचिनने पाकिस्तानच्या गोलंदाजीची पिसे काढत, पाकिस्तानिवरुद्ध कशी फटकेबाजी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ दाखवून दिला.
या सामन्याविषयी दस्तुरखुद्द सचिन म्हणाला होती की, माझ्या आयुष्यातील पाकिस्तानविरुद्धचा हा महत्वाचा सामना होता. या सामन्याची चर्चा 2002 सालापासूनच सुरु होती. आणि सचिनने आपल्या नजाकतपूर्ण खेळीच्या जोरावर हा सामना यादगार केला होता.
या सामन्यात सचिनने 75 चेंडूंमध्ये 98 धावांच नेत्रदीपक खेळी साकारली आणि त्यामुळे भारताला सहा विकेट्स राखून पाकिस्तानवर मात करता आली होती. 

Web Title: Sachin tendulkar smashesh shoaib akhtar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.