सचिन तेंडुलकर वयाच्या 40 वर्षांपर्यंत खेळू शकतो, तर आशिष नेहरा का नाही? वीरेंद्र सेहवाग

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांची भारतीय संघात निवड केल्यानंतर त्याच्या निवडीबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 05:49 PM2017-10-05T17:49:24+5:302017-10-05T19:15:57+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar can play for 40 years while Ashish Nehra is not there? Virender Sehwag | सचिन तेंडुलकर वयाच्या 40 वर्षांपर्यंत खेळू शकतो, तर आशिष नेहरा का नाही? वीरेंद्र सेहवाग

सचिन तेंडुलकर वयाच्या 40 वर्षांपर्यंत खेळू शकतो, तर आशिष नेहरा का नाही? वीरेंद्र सेहवाग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देसचिन खेळू शकतो मग नेहरा का नाही?आशिष नेहराच्या निवडीचे सेहवागकडून समर्थनखेळण्यासाठी वयाची अट नाही

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांची भारतीय संघात निवड केल्यानंतर त्याच्या निवडीबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा वयाच्या 40 वर्षांपर्यंत खेळू शकते, तर आशिष नेहरा का नाही खेळू शकत असा सवाल भारताचा माजी सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने करत आशिष नेहराच्या निवडीचे समर्थन केले आहे. 
2020 साली होणा-या टी-20 वर्ल्डकपमध्ये आशिष नेहरा खेळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी कोणत्याही वयाची अट नाही, असे मला वाटते. मात्र, आशिष नेहरा फिट आहे आणि तो कमी धावा देऊन जास्त विकेट्स घेऊ शकतो. त्यामुळे तो वर्ल्डकपमध्ये का खेळू शकत नाही?  
श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्या वयाच्या 42 वर्षांपर्यंत क्रिकेट खेळला होता. सचिन तेंडुलकरने वयाच्या 40 वर्षांपर्यंत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर आशिष नेहरा का नाही करु शकत असा सवालही वीरेंद्र सेहवागने केला. तसेच, सध्याच्या परिस्थितीत भारतीय संघातील कोणताही खेळाडू फिट नाही, असे मला वाटत नाही, असेही यावेळी वीरेंद्र सेहवाग म्हणाला. 
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका येत्या सात ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. टी-20 चा पहिला सामना रांची येथे खेळविला जाणार आहे. 

Web Title: Sachin Tendulkar can play for 40 years while Ashish Nehra is not there? Virender Sehwag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.