रोहितच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा

विराट कोहलीसह काही खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाची धुरा रोहितकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत युवा खेळाडूंसह खेळताना रोहितच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा पाहायला मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 06:18 PM2018-03-05T18:18:36+5:302018-03-05T18:18:36+5:30

whatsapp join usJoin us
Rohit's fire test | रोहितच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा

रोहितच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमंगळवारपासून तिरंगी ट्वेन्टी-20 मालिकेला सुरुवात ; भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने प्रारंभ

कोलंबो : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेत तिरंगी ट्वेन्टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मंगळवारी भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यातील सामन्याने मालिकेला सुरुवात होणार आहे. विराट कोहलीसह काही खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाची धुरा रोहितकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत युवा खेळाडूंसह खेळताना रोहितच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा पाहायला मिळणार आहे.
भारतीय संघात रोहित आणि शिखर धवन हे दोन्ही नावाजलेला सलामीवीर आहेत. त्याचबरोबर सुरेश रैना हा ट्वेन्टी-20 क्रिकेटमधला नामांकित खेळाडू आहे. दिनेश कार्तिक आणि रीषभ पंत या दोन यष्टीरक्षकांमधून नेमकी कोणाला संधी द्यायची, हा प्रश्न संघ व्यवस्थापनाला सोडवावा लागणारा आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज यांच्यावर असेल. युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांच्यावर फिरकी गोलंदाजीची मदार असेल. मनीष पांडे, दीपक हुडा, लोकेश राहुल हे मध्यला फळीची जबाबदापी कशी पेलवतात, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
दिनेश चंडिमलच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. पण  सुरंगा लकमल, उपुल थरंगा, दानुष्का गुणतिलका, कुशल मेंडिस, थिसारा परेरा, जीवन मेंडीस यांच्याकडून चांगल कामगिरी पाहायला मिळाली आहे. पण या खेळाडूंना सातत्यपूर्ण कामगिरी मात्र करता आलेली नाही. दोन्ही संघांचा फॉर्म पाहता श्रीलंकेपेक्षा भारताचे पारडे जड समजले जात आहे.

भारतीय संघ  : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज आणि रीषभ पंत.
श्रीलंकेचा संघ : दिनेश चंडिमल (कर्णधार), सुरंगा लकमल, उपुल थरंगा, दानुष्का गुणतिलका, कुशल मेंडिस, दासुन शनाका, कुशल परेरा, थिसारा परेरा, जीवन मेंडीस, इसुरु उदाना, अकिला धनंजया, अमिला अपोन्सो, नुवान प्रदीप, दुष्मंथा चमीरा, धनंजय डीसिल्व्हा.
वेळ : रात्री 7.00 वा. पासून.

Web Title: Rohit's fire test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.